तरुण भारत

आरक्षणाचे `’स्ट्रक्चर’च बदलणार

-81 वरून 90 सदस्य झाल्याचे परिणाम -खुल्या वर्गाचे 24 वरून 27 सदस्य होणार

विनोद सावंत/कोल्हापूर

Advertisements

महापालिकेची निवडणूक त्रिदस्यीय प्रभाग रचनेनुसार होणार असल्याने नव्याने प्रभाग रचना, आरक्षण काढली जाणार आहे. विशेष म्हणजे महापालिकेची 81 वरून 90 सदस्य संख्या होणार आहे. 9 जागा वाढणार असल्याने यापूर्वीचे जे आरक्षणाचे संख्याबळ होते. त्यामध्ये आता बदल होणार आहे. ओबीसी आरक्षणही कायम राहिले आहे. त्यामुळे आता खुल्या प्रवर्गचे 54, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग 24 आणि अनुसुचित जातीचे 12 सदस्य असणार आहेत.

कोल्हापूर महापालिकेची निवडणूकीचे जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये बिगुल वाजणार आहे. राज्य शासनाने महापालिकेची एक सदस्यीय प्रभाग रचना रद्द करत त्रिसदस्यीय प्रभाग रचनेचा निर्णय घेतला आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांनी शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत शहराची वाढलेली लोकसंख्या आणि नागरीकरणामुळे त्रिसदस्यीय प्रभाग रचनेत 9 सदस्य वाढणार असून 81 वरून 90 सदस्य होतील, असे स्पष्ट केले आहे. नवीन प्रभाग रचनेनुसार आता 30 वॉर्डमधून आता 90 सदस्यांना निवडून द्यावे लागणार आहे. सदस्य संख्या वाढल्याने आरक्षणातही बदल होणार आहे.

 2015               2021

 अनुसूचित जातीचे प्रभाग –         11                    12

नागरिकांचा मागासवर्ग प्रभाग महिला-   11                   12

नागरिकांचा मागसवर्ग                11                    12

ओपन –                        48                    54

 एकूण                    81                      90

आता 45 जागा महिलांसाठी राखीव

कोल्हापूर महापालिकेची निवडणूक 90 सदस्यांसाठी होणार आहे.                                                                                        यामध्ये 50 टक्के महिलांसाठी राखीव जागा असणार आहेत. नवीन सभागृहात  45 महिला नगरसेविका असणार आहेत. यामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गमधून 6, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातून 12 आणि खुल्या प्रवर्गातून 27 महिला सभागृहात येतील.

महापौरपदासाठी होणार रस्सीखेच

पुढील अडीच वर्ष महापौरपद नागरिकांचा मागासवर्ग महिला प्रवर्गासाठी आरक्षित आहे. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण रद्द केले होते. मात्र, राज्यशासनाने अध्यादेश काढल्याने ओबीसीचे आरक्षण कायम आहे. त्यामुळे महापौरपद डोळÎा समोर ठेवून फिल्डींग लावली जात आहे. ओबीसी महिलांसाठी 12 जागा आरक्षित आहेत. उर्वरीत 12 ओबीसी राखीव जागे मधूनही ओबीसी महिला निवडणूक लढवू शकतात.

कोणाचा पत्ता कट, कोणाला संधी

 81 प्रभागानुसार आरक्षण सोडत काढली होती. इच्छुकांनी यानंतर प्रचारालाही सुरवात केली होती. आता 90 सदस्य झाल्याने अनुसूचित जाती प्रवर्गासह नव्याने आरक्षण निघणार आहे. यामुळे 90 सदस्यामध्ये 12 ओबीसी महिला, 12 ओबीसी आणि 12 अनूसुचित जाती 12 आणि 27 महिला असे 63 सदस्यांसाठी आरक्षण काढले जाणार आहे. हे नेमके आरक्षण कोणत्या प्रभागात पडणार यावर इच्छुकांच्या नजरा आहेत. यामध्ये कोणाचा पत्त कट होणार कोणाला पुन्हा संधी मिळणार हे आरक्षण सोडतीनंतर स्पष्ट होणार आहे.

निवडणूक प्रक्रिया अशी होणार

-प्रत्येकी 3 सदस्य प्रमाणे 30 वॉर्डची प्रभाग रचना जाहिर होणार

-रोटेशन प्रमाणे 90 पैकी 63 जागांवर आरक्षण टाकले जाणार

-शिल्लक राहिलेल्या खुल्या प्रवर्गातील 27 जागांची घोषणा होणार

 वर्ष                 नगरसेवक संख्या

1967 ते 72           49

1972-77             55

1978-84              59

1985-90              60

1990-95              60

1995-2000            72

2000-2005             72

2005-10               78

2010-15                77

2015-20               81

2021-26                90

Related Stories

चंदूरात एका दिवसात 13 पॉझिटिव्ह,तर एक म्युकर मायकोसिस रुग्ण

triratna

इचलकरंजीतील कोरोना प्रतिबंध लसीकरण केंद्रावर नागरिकांच्यात गोंधळ

triratna

कुंभोजमध्ये जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा ; शिरोलीच्या सर्वेश्वर संघाला उपविजेतेपद

triratna

मलकापूर उपनगराध्यक्ष निवड बिनविरोध

triratna

पानपट्टीवाल्याने केली चक्क सफरचंदाची लागवड

triratna

ई – पासची सोय गायब; तातडीच्या कामासाठी पर्याय संपल्याने नागरीकांमध्ये नाराजी

triratna
error: Content is protected !!