तरुण भारत

आनंदराव अडसूळ यांना ईडीचे समन्स; चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

ऑनलाईन टीम / मुंबई :

सिटी बँक घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि त्याचे पुत्र अभिजीत अडसूळ यांना ईडीने समन्स बजावले आहे. बडनेराचे आमदार रवि राणा यांच्या तक्रारीवरुन ईडी या पितापुत्राची चौकशी करणार आहे.

Advertisements

सीटी बँकेमध्ये जवळपास नऊ हजार खातेधारक होते. या खातेधारांचे पैसे अवैधरित्या बिल्डरांना वाटून त्यामध्ये आडसूळ यांनी 20 टक्के कमेशन घेतले. त्यामुळे बँकेत 980 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आडसूळ यांच्यावर करण्यात आला आहे. त्यामुळे ईडीने अडसूळ पितापुत्राला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, अडसूळ यांच्या घरी सकाळीच ईडीचे अधिकारी दाखल झाले असून, त्यांनी अडसूळ यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले आहे. अडसूळ यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. सिटी बँकेची उलाढाल 800 कोटींची असताना 980 कोटींचा घोटाळा झालाच कसा? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच बँकेतील घोटाळ्याची माहिती मिळाल्यावर मी बँक अधिकाऱयांविरोधात फसवणुकीचा तपास करणाऱया संस्थांकडे तक्रार दिली आहे, असे अडसूळ यांनी सांगितले.

Related Stories

कोविड प्रोटोकॉल पाळण्याचे राज्यांना निर्देश

Patil_p

आर्थिक दुर्बल घटकातील आरक्षण नको

triratna

देशात कोरोना बाधितांची संख्या 78 हजार पार

Rohan_P

सातारा सैनिक स्कूलमध्ये मिळणार मुलींनाही प्रवेश

Patil_p

आरक्षण द्या; अन्यथा आम्हाला विष पिऊन मरु द्या

Patil_p

माझ्या हिंदुत्वाला तुमच्या प्रमाणपत्राची गरज नाही : उध्दव ठाकरे

Rohan_P
error: Content is protected !!