तरुण भारत

भारतीय जन संविधान मंचाच्यावतीने 21 ऑक्टोबरला राष्ट्रीय परिषद

प्रतिनिधी / कोल्हापूर

राजकारणात चांगले लोक येऊन राजकारणाचे शुध्दीकरण व्हावे यासाठी भारतीय जन संविधान मंचाच्यावतीने देशपातळीवर 21 ऑक्टोबर रोजी दिल्ली येथे तज्ञ मान्यवरांच्या उपस्थितीत विचार मंथन करण्यासाठी परिषदेचे आयोजन केले आहे. `समीट ऑन द लीडरशिप पॉझिटिव्ह’ हा परिषदेचा विषय असल्याची माहीती राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य व माजी परराष्ट्र सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी पत्रकाराशी बोलताना दिली.

Advertisements

कोल्हापूरच्या विकासासाठी आयोजित कोल्हापूरच्या विकासाच्या वाटा या कार्यक्रमानंतर ंते पत्रकाराशी बोलताना सांगितले. यावेळी डॉ मुळे यांनी गेल्या 70 वर्षाममध्ये कोल्हापूरचा म्हणावा तसा विकास झालेला नाही. कचऱयासह पंचगंगा प्रदुषण, शुध्द पिण्याचे पाणी, बेरोजगारी, आदी हे जनतेचे प्रश्न आजअखेर प्रलंबित आहेत. राजगार, महापालिकेचा कारभाराचा प्रश्न कसा सोडवता येईल यावर आजच्या कार्यकमात चर्चा झाली असल्याचे यांनी सांगितले.

जनता- प्रशासन, सरकार-मतदार, उद्योजक- शैक्षणिक संकुल, सामाजिक संस्था यांच्यामध्ये सतत संवाद होणे आवश्यक आहे. यांच्या विचारमंथन झाले तरच समाजकारण आणि राजकारणाचे शुध्दीकरण होणार आहे. यासाठी 21 ऑक्टोबर रोजी दिल्ली येथील कौन्स्टयुशन कल्बच्या हॉलमध्ये देशभरातील विविध 100 तज्ञ मान्Îवरांच्या उपस्थितीत ही बैटक होणार आहे. नोबल पुरस्कार विजेता, भारत रत्न कैलास सत्यार्थी यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन होणार आहे. चांगली माणंसाना चांगले काम करण्यासाठी एकत्र आणणे हा यामागील उद्दिष्टे आहे. येत्या कोल्हापूर महानगर पालिका निवडणूकीमध्ये शहराचा कचरा, महीला सक्षमीकरण, संविधन आदी मुद्दा घेतला जाणार आहे. नागरिक केंद्रीत भावनेने काम झाले पाहिजे. तक्रार निरसनाची प्रक्रिÎा सक्षम झाली. यावेळी शिवराज नायकवडी, पारस ओसवाल, प्रतिक ओसवाल सुर्यकांत घोडभिशे, निनाद काळे उपस्थित होते.

Related Stories

करवीर तालुक्यात दिवसभरात 27 रुग्णांची भर

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्ह्यातील १०० केंद्रांवर लसीचा तुटवडा

Abhijeet Shinde

कागल तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींवर अखेर शासकीय प्रशासकांची नियुक्ती

Abhijeet Shinde

कोल्हापूर शहरात भटकी जनावरे पकडण्याची मोहीम सुरू

Abhijeet Shinde

कोल्हापूर : दुपारपर्यंत 80 कोरोना बाधितांची भर, शहरातील 60 जण

Abhijeet Shinde

काळम्मावाडी धरणग्रस्त संघटनेच्यावतीने रास्ता रोको

Abhijeet Shinde
error: Content is protected !!