तरुण भारत

अन्यायी कृषी कायद्याविरोधात शेतकरी रस्त्यावर

प्रतिनिधी / कोल्हापूर

दिल्लीत गेल्या दहा महिन्यांपासून तीन अन्यायी कृषी कायद्याविरोधात शेतकऱयांनी आंदोलन पुकारले आहे. शेतकऱयांचा लढा सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारच्या भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी शहरासह जिह्यात संयुक्त शेतकरी मोर्चाच्या वतीने जिल्हा बंदचे आवाहन केले होते. याला शहरासह जिह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. ऐतिहासिक बिंदू चौकात भाजप वगळून सर्वपक्षियांनी एकत्र जमून केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात निषेध नोंदविला.

Advertisements

कॉर्पोरेट कंपन्यांच्या हिताचे आणि जनतेविरोधी तीन शेती कायदे आणि चार कामगार संहिता रद्द करा, शेतीमालाला सर्वंकष उत्पादन खर्च अधिक 50 टक्के दर देणारा हमीभावाचा वीज विधेयके मागे घ्या, डिझेल-पेट्रोल, गॅसचे दर निम्मे करा, शिक्षणाचे खासगीकरण करणारे नवीन शैक्षणिक धोरण मागे घ्या आणि देशाच्या लोकशाही, धर्मनिरपेक्ष संविधानाचे पालन करा, या प्रमुख मागण्यांसाठी काँग्रेस, राष्ट्वादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मावर्सवादी कम्युनिस्ट पक्ष, आम आदमी पार्टी, जनता दल, लाल निशाण पक्ष, श्रमिक मुक्तीदल, सीटू, आयटक, डेमॉक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया या पक्षांनी या बंदला पाठिंबा दर्शविला. बिंदू चौकात सर्वपक्षीयांच्या आंदोलनात सुरुवातीला शाहीर रंगराव पाटील यांनी आपल्या पोवाडÎातून शेतकऱयांच्या व्यथांना वाट करू दिली. शेतकरी बंधूनो ऐका प्रसंग बाका, वादळात नौका, दडपला शेतकऱयांचा आवाज' या कवनातून शेतकऱयांना जागरूक राहण्याचे आवाहन केले. तसेचजगायचं काय, मरायचं काय आता काय माग सरायचं नाही’ अशा शब्दांत त्यांनी शेतकऱयांचा निर्धार बोलून दाखवला.

दिल्लीत दहा महिन्यांपासून शेतकऱयांचे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारने या शेतकऱयांची दखल घेतली नाही. आता यापुढे शेतकऱयांची गंभीर दखल घेतली नाहीतर याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा संयुक्त शेतकरी मोर्चाचे निमंत्रक माजी आमदार संपतराव पवार-पाटील केंद्र सरकारला दिला. दिल्लीत उन्हापावसात शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. या शेतकऱयांप्रती आस्था निर्माण करण्याची आज गरज आहे. निसर्ग आमच्याबरोबर नाही, इतर राज्यातील सरकार आमच्याबरोबर नाहीत, अशी खंतही त्यांनी यावेळी बोलून दाखविली.

दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. भारत देश अदानी- अंबानींच्या घशात घालण्याचा डाव सुरू आहे. तीन शेतकरी कायदे शेतकऱयांसाठी घातक आहेत, असे राष्ट्रवादीचे आर. के. पवार म्हणाले. भाकपचे कॉ. सतीशचंद्र कांबळे म्हणाले, अन्यायी तीन कृषी कायदे रद्द करण्याची मागणी पहिल्यांदा कोल्हापुरातून होत आहे. राज्यातून ज्याप्रमाणे भाजपला हद्दपार केले त्या पद्धतीने कोल्हापुरातूनही भाजपला हद्दपार करूया, असे आवाहन केले. पंतप्रधान शेतकऱयांविषयी बोलायला तयार नाहीत. त्यांच्या `मन की बात’मध्ये शेतकऱयांची साधी चर्चाही करत नाहीत, असे आक्षेप जनता दलाचे रवी जाधव यांनी नोंदविला.

गॅस महागला आहे. गवंडी, सेंट्रिग कामगारांचे घर चालणे मुश्किल झाले आहे. याकडे महिला आघाडीच्या शीतल चिवडे यांनी लक्ष वेधले. यावेळी `आप’चे संदीप देसाई, अशोकराव साळुंखे, मावळा ग्रुपचे उमेश पोवार, उदय नाडकर, काँग्रसचे प्रल्हाद चव्हाण यांनी भारत बंदला उत्सफूर्त पाठिंबा देत शेतकऱयांच्या पाठिशी उभे राहण्याचे आवाहन केले.

काँग्रेसची शहरातून दुचाकी रॅली

दरम्यान, राष्ट्रीय काँग्रेसने शहरातून दुचाकी रॅली काढली. शहरात काही ठिकाणी दुकाने बंद होती तर काही ठिकाणी सुरू होती. वाहतुकीस अडथळा होऊ नये यासाठी वाहतूक शाखेने चोख बंदोबस्त ठेवला होता. तीन शेती काळे कायदे रद्द करा, शेतकरी वाचवा देश वाचवा या घोषणांनी बिंदू चौक परिसर दणाणून गेला होता.

जिह्यात हलकर्णी फाट्याजवळ शेतकरी संघटनेच्या जवळपास 500 लोकांनी आंदोलन केले. मुद्दाळ तिट्टा येथे 300, शिरोली फाट्याजवळ 150 तसेच बाबंवडे, शाहूवाडी, हातकणंगले येथे लोकांनी आंदोलनाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिल्याची माहिती अतुल दिघे यांनी दिली.

कसलं हे सरकार…

आंदोलने आमच्या पाचवीलाच पुजलेली आहेत. 2014 साली स्वामिनाथन आयोगासाठी आम्ही मोदी सरकारला स्वीकारले. मात्र आता तेच मोदी सरकार आम्हाला मातीत मिसळत आहे, कसलं हे सरकार ?, अशा शब्दांत संपतराव-पवार पाटील यांनी मोदी सरकारविरोधात नाराजी व्यक्त केली.

Related Stories

वरसोली येथे पॅरासेलिंग अपघात ; दोन महिला बचावल्या

Sumit Tambekar

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाने चौघांचा मृत्यू

Abhijeet Shinde

कोल्हापूर : सहकारी संस्थांच्या निवडणुकांना मिळाला मुहूर्त

Abhijeet Shinde

कोल्हापूर : पेठ वडगावात कडक लॉकडाऊनची नागरिकातून मागणी

Abhijeet Shinde

कोल्हापूर : सेनेचे खासदार उतरणार मनपा रणांगणात

Abhijeet Shinde

आढावा बैठकीत खड्डेमय रस्त्यांवरून अधिकारी धारेवर

Abhijeet Shinde
error: Content is protected !!