तरुण भारत

भारतीय महिला फुटबॉल संघाची घोषणा

नवी दिल्ली

संयुक्त अरब अमिरात आणि बहरीन येथे होणाऱया मित्रत्वाच्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामन्यासाठी प्रमुख प्रशिक्षक थॉमस डेनरबी यांनी सोमवारी 23 सदस्यांच्या भारतीय फुटबॉल संघाची घोषणा केली.

Advertisements

राष्ट्रीय महिला फुटबॉल संघाचे वास्तव्य जमशेदपूरमध्ये आहे. आता हा संघ  संयुक्त अरब अमिरातला 2 ऑक्टोबरला प्रयाण करणार आहे. भारतीय महिला फुटबॉल संघाचे दोन मित्रत्वाचे सामने संयुक्त अरब अमिरात आणि टय़ुनिशिया संघाबरोबर खेळविले जाणार आहेत. या सामन्यानंतर भारतीय महिला फुटबॉल संघ बहरीनला प्रयाण करेल. बहरीनमध्ये हा संघ 10 ऑक्टोबरला बहरीन संघाबरोबर तर त्यानंतर 13 ऑक्टोबरला चिनी तैपेई संघाबरोबर सामने खेळणार आहे. या दौऱयासाठी भारतीय महिला फुटबॉल संघाला झारखंडमध्ये तब्बल एक महिन्यासाठी सराव शिबीर आयोजित केले होते.

भारतीय महिला फुटबॉल संघ- गोलरक्षक- आदिती चौहान, मैबम लिंथोइनगम्बी देवी, श्रेया हुडा, बचावफळी- दलिमा छिब्बर, स्वीटी देवी, रितु राणी, आशालता देवी, रंजना चानू, मिचेल कॅस्तान्हा, मनिषा पन्ना, ऍस्टम ओरॉन, मध्यफळी- संगीता बसफोर, इंदुमती कथिरेसन, संजु, मार्टिना टी., आघाडीफळी-दांगमेई ग्रेस, अंजू तमंग, संध्या रंगनाथन, सौम्या गुगुलोथ, मनिषा कल्याण, सुमती कुमारी, प्यारी झाझा आणि रेणु.

Related Stories

मँचेस्टर युनायटेडला पराभवाचा धक्का

Patil_p

अबिद अली अर्धशतकासमीप

Patil_p

ऑलिम्पिक आयोजन समिती अध्यक्ष योशिरो राजीनाम्याच्या पवित्र्यात

Amit Kulkarni

टी-20 चा वर्ल्डकप हेच ट्वेन्टी-20 चे लक्ष्य!

Patil_p

लंकेला विजयासाठी 247 धावांचे आव्हान

Patil_p

रियल माद्रिद संघात बेंझेमाचे पुनरागमन

Patil_p
error: Content is protected !!