तरुण भारत

मर्सिडीजच्या हॅमिल्टनचे 100 वे जेतेपद

वृत्तसंस्था/ सोची, रशिया

मर्सिडीजच्या लेविस हॅमिल्टनने 100 वे ग्रां प्रि जेतेपद मिळवित असा पराक्रम करणारा पहिला फॉर्मुला वन ड्रायव्हर होण्याचा बहुमान मिळविला. येथे झालेली सोची ग्रां प्रि शर्यत जिंकून त्याने चॅम्पियनशिप रेसमध्ये व्हर्स्टापेनला मागे टाकत पुन्हा एकदा अग्रस्थान मिळविले आहे. रेड बुलच्या मॅक्स व्हर्स्टापेनने दुसरे तर फेरारीच्या कार्लोस सेन्झने तिसरे स्थान मिळविले.

Advertisements

इंजिन पेनल्टीमुळे व्हर्स्टापेनला 20 व्या स्थानावरून सुरुवात करावी लागली. तरीही त्याने दुसरे स्थान मिळविण्यापर्यंत मजल मारली. हॅमिल्टनने आता व्हर्स्टापेनवर दोन गुणांची आघाडी घेतली असून या मोसमातील अद्याप सात शर्यती बाकी आहेत. या शर्यतीआधी हॅमिल्टन मॅक्सपेक्षा पाच गुणांनी मागे होता आणि त्याने चौथ्या स्थानावरून सुरुवात केली होती. मॅक्लारेनचा लँडो नॉरिस शेवटच्या तीन लॅपमध्ये आघाडीवर होता. पण पाऊस सुरू झाल्यानंतर ट्रकवरील निसरड टाळण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्याला सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले.

हॅमिल्टनने मायकेल शुमाकरचा 91 जेतेपदांचा विक्रम मागील मोसमातच मागे टाकला होता. मॅक्सने शेवटच्या स्थानावरून सुरुवात करून दुसरे मिळविल्यानंतर हॅमिल्टनने त्याच्या कामगिरीचे कौतुक केले. याशिवाय पावसामुळे नॉरिसची गाडी घसरल्याने त्याला मागे टाकण्याची संधी मिळाल्याचेही तो म्हणाला. हॅमिल्टनने 100 वा विजय साजरा केला तर त्याच्या टीमने सोचीमध्ये मिळविलेल्या शंभर टक्के यशाचा आनंद साजरा केला. 2014 पासून मर्सिडीजने सोचीमध्ये झालेली प्रत्येक शर्यत जिंकली आहे. मॅक्लारेनच्या डॅनियल रिकार्दोने चौथे, मर्सिडीजच्या व्हाल्टेरी बोटासने 16 व्या स्थानावरून सुरुवात करीत पाचवे स्थान मिळविले.

Related Stories

‘बायो-बबल’ तोडले तर मिळेल ‘ही’ शिक्षा!

Patil_p

सत्यवर्त, सुमित उपांत्यपूर्व फेरीत, धनकर पराभूत

Amit Kulkarni

भारतीय महिला हॉकी संघाचा पराभव

Patil_p

प्रो हॉकी लीग मोसम वाढविण्याचा निर्णय

Patil_p

पहिल्या दिवसअखेर बांगलादेश 2 बाद 302

Patil_p

मियामी स्पर्धेत मरेला वाईल्डकार्डद्वारे प्रवेश

Patil_p
error: Content is protected !!