तरुण भारत

भावना गवळींच्या अडचणी वाढल्या; ‘या’ व्यक्तीच्या अटकेने ईडीकडून चौकशी होण्याची शक्यता

वाशीम/प्रतिनिधी

किरीट सोमय्यांनी (kirit somaiya) वाशीम-यवतमाळच्या शिवसेना खासदार भावना गवळी (Bhavana Gawali Member of the Lok Sabha) यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. ३० ऑगस्ट रोजी ईडीने वाशीम (Washim) जिल्हय़ातील रिसोड व इतर ठिकाणच्या गवळी यांच्या संस्थांमध्ये झडती घेतली होती. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी गवळींवर १०० कोटींच्या घोटाळयाचा आरोप केला आहे. या धाड सत्रानंतर गवळी यांच्या दोन निकटवर्तीय सहकाऱ्यांना ईडीसमोर हजर राहण्याची नोटीस पाठवण्यात आलेली. महिला उत्कर्ष प्रतिष्ठानशीसंबंधित दोन व्यक्तींना ईडीने समन्स पाठवले होते. आर्थिक गैरव्यवहारांप्रकरणी हे समन्स पाठवण्यात आले होते.

आता ईडीने गवळी यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठानमध्येच (Mahila Utkarsh Pratishthan) बदल करुन त्याचे कंपनीमध्ये रुपांतर करण्यात आल्याप्रकरणी या कंपनीचे संचालक सईद खान यांना अटक करण्यात आली आहे. ईडीने (ED) ही अटक केलीय. सोमवारी रात्री आठच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे. मात्र ही अटक बेकायदेशीर असल्याचा दावा खान यांच्या वकीलांनी केलाय.

ईडीने सईद खान यांना अटक केल्यानंतर त्यांचे वकील इंद्रापल सिंह यांनी खान हे ईडीकडून देण्यात आलेल्या सर्व सुचनांचे पालन करण्याबरोबरच तपासात सहकार्य करत असतानाही ही अटक करण्यात आल्याबद्दल सिंह यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या अटकेमुळे गवळी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जातंय. ज्या कंपनीच्या चौकशीसाठी खान यांना अटक करण्यात आलीय त्याच कंपनीमध्ये गवळी या निर्देशक म्हणजेच डायरेक्टर होत्या. त्यामुळे आगामी काळामध्ये गवळी यांची या प्रकरणामध्ये चौकशी केली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

महिला उत्कर्ष प्रतिष्ठानशीसंबंधित दोन व्यक्तींना ईडीने समन्स पाठवले होते. आर्थिक गैरव्यवहारांप्रकरणी हे समन्स पाठवण्यात आले होते. दोघांनाही ईडीच्या तपास अधिकाऱ्यांसमोर हजर रहावे असं या समन्समध्ये म्हटलं होतं. मात्र या दोन्ही व्यक्तींनी खासगी कारण देत आपल्याला ईडीसमोर हजर राहण्यासाठी १५ दिवसांचा अवधी घ्यावा अशी मागणी ६ सप्टेंबर रोजी केली होती.

Advertisements

Related Stories

बोईंगकडून अपाचे, चिनूकचा भारताला पुरवठा

datta jadhav

कोल्हापूरला येणारच, हिम्मत असेल तर अडवून दाखवा, किरीट सोमय्यांचं राष्ट्रवादीला आव्हान

Abhijeet Shinde

काका-बाबांची दिलजमाई ही परिवर्तनाची नांदी

Patil_p

अँकर कोरोनाविरुध्द एकजुटीने लढा द्या

Patil_p

पाकिस्तानकडे लस खरेदीसाठीही नाहीत पैसे

datta jadhav

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी घेतली गृहमंत्री अमित शाहांची भेट

Abhijeet Shinde
error: Content is protected !!