तरुण भारत

पुराच्या पाण्यात एसटी बस गेली वाहून; बचावकार्याला वेग

ऑनलाईन टीम / यवतमाळ :

यवतामळमधील उमरखेडनजीकच्या दहागाव येथे पुराच्या पाण्यात एसटी बस वाहून गेल्याची दुर्देवी घटना आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली. पुरात वाहून गेलेली बस नागपूर आगाराची असून बसमध्ये चालकासह सहा जण असल्याची माहिती मिळत आहे. स्थानिक आणि प्रशासनाच्या मदतीने बचावकार्याला वेग आला आहे.

Advertisements

आज सकाळी आठच्या सुमारास नागपूर आगाराची एसटी बस उमरखेडवरुन पुसद येथे जात होती. सोमवारी रात्री विदर्भाला मुसळधार पावसाने झोडपल्याने दहागाव येथील नालाच्या पुलावरून पाणी वाहत होते. मात्र, एसटी चालकाने भलतेच धाडस दाखवत ही बस पुलावरुन नेल्याने ती पुराच्या पाण्यात वाहून गेली. या बसमध्ये चालकासह सहा जण असल्याची माहिती मिळत आहे. स्थानिकांच्या मदतीने दोन प्रवाशांना वाचवण्यात यश आले आहे तर एका प्रवाशाचा मृत्य झाला आहे. इतर प्रवाशांच्या बचावासाठी स्थानिक प्रशासनाकडून बचावकार्य सुरू आहे.

Related Stories

चिनी वस्तूंवर सीमा शुल्क वाढविण्याचा सरकारचा विचार

datta jadhav

ऑक्सिजनचा दाब कमी झाल्याने दिल्लीत 25 रुग्णांचा मृत्यू

datta jadhav

दिलासा : महाराष्ट्रात मागील 24 तासात 13,051 रुग्ण बरे!

Rohan_P

मोठा दिलासा : महाराष्ट्रात मागील 24 तासात 48,211 रुग्ण कोरोनामुक्त!

Rohan_P

तृतीयपंथीयांसाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये १ टक्के जागा राखीव; कर्नाटक सरकारचा ऐतिहासिक निर्णय

Abhijeet Shinde

झोपेतून जागे व्हा आणि कोरोना समस्यांचा सामना करा – केंद्राला आयएमएने सुनावलं

Abhijeet Shinde
error: Content is protected !!