तरुण भारत

कुत्र्यांचे आज मोफत रेबीज लसीकरण

जागतिक रेबीज दिनी पशुसंगोपन खात्याचा उपक्रम

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

रेबीजला आळा घालण्यासाठी पशुसंगोपन खात्यामार्फत जिल्हय़ात मंगळवार दि. 28 रोजी जागतिक रेबीज दिनानिमित्त श्वानांसाठी मोफत रेबीज प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. जिल्हय़ातील 193 लहान-मोठय़ा पशुवैद्यकीय दवाखान्यांतून पाळीव कुत्र्यांना रेबीज प्रतिबंधक लस दिली जाणार आहे. संबंधित श्वानपालकांनी जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात जावून कुत्र्यांना लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन खात्याने केले आहे.

अलीकडे माणसांबरोबर जनावरांवरदेखील कुत्र्यांकडून हल्ले होण्याच्या घटना वाढल्या आहेत. पिसाळलेला कुत्रा चावल्यानंतर रेबीज रोगाची लागण होते. याकरिता पशुसंगोपनतर्फे खबरदारी म्हणून मंगळवारी जागतिक रेबीज दिनाचे औचित्य साधून संपूर्ण जिल्हय़ात रेबीज प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविली आहे. संबंधित श्वानमालकांनी सकाळी 9 ते 12 यावेळेत जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात जावून लस घ्यावी, अशी माहिती पशुसंगोपनमार्फत देण्यात आली आहे.

जिल्हय़ातील अथणी, चिकोडी, रायबाग, गोकाक, संकेश्वर, मुडलगी, निपाणी, कागवाड, हुक्केरी आदी तालुक्मयांत ही मोहीम राबविली जाणार आहे. जिल्हय़ात पाळीव कुत्र्यांची संख्या अधिक आहे. तालुक्मयात 9,080 पाळीव कुत्री आहेत. बेळगाव मुख्य दवाखान्यासह हिरेबागेवाडी, सांबरा, उचगाव, अनगोळ, के. के. कोप्प, हुदली, कडोली, संतिबस्तवाड, येळळूर, बेळगुंदी, आंबेवाडी, काकती, सुळेभावी, महांतेशनगर, वडगाव, हलगा, निलजी, नंदिहळ्ळी, किणये आदी ठिकाणी असलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्यांतून रेबीज लस दिली जाणार आहे.

वडगाव, हिंडलगा येथे विशेष रेबीज प्रतिबंधक लसीकरण

वझे गल्ली, (मराठी शाळा क्रमांक-5) वडगाव आणि विजयनगर दुसरा क्रॉस, हिंडलगा येथील कामधेनू पशुपक्षी सेवा केंद्रात दिवसभर विशेष रेबीज प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे.

Related Stories

जळगावमध्ये 12 वऱहाडींचा मृत्यू

Patil_p

सराफी पेढीतील चेन पळविणाऱया जोडगोळीला अटक

tarunbharat

धामणे परिसरात भक्तीमय वातावरणात दसरोत्सव साजरा

Patil_p

उद्यापासून बेंगळूरमध्ये कोणत्याही प्रकारचा लॉकडाउन नाहीः मुख्यमंत्री येडियुरप्पा

Abhijeet Shinde

रामनगर येथील कित्तूर चन्नम्मा वसती शाळेत कोविड केअर सेंटर

Omkar B

शारदोत्सव महिला सोसायटीच्या स्पर्धेला प्रतिसाद

Amit Kulkarni
error: Content is protected !!