तरुण भारत

ज्ञान प्रबोधन शाळेत एनसीसी युनिटचे उद्घाटन

एनसीसी सुरू करणारे परिसरातील पहिले आयसीएसई स्कूल

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

तरुण भारत ट्रस्ट संचलित ज्ञान प्रबोधन मंदिर स्कूलमध्ये 25 कर्नाटक एनसीसी बटालियन युनिट सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे. या अनुशंगाने  एनसीसी बटालियनच्या फलकाचे सोमवारी शाळेच्या परिसरात अनावरण करण्यात आले. कर्नाटक व गोवा एनसीसी विभागाचे कमांडिंग ऑफिसर कर्नल राजीव सहानी यांच्या हस्ते फलकाचे अनावरण करण्यात आले. ज्ञान प्रबोधन मंदिर एनसीसी युनिट सुरू करणारी बेळगाव परिसरातील पहिली आयसीएसई शाळा ठरली आहे.

या कार्यक्रमाला तरुण भारत ट्रस्टचे चेअरमन किरण ठाकुर, संचालक जगदीश कुंटे, नितीन कपिलेश्वरकर, प्रा. अनिल चौधरी, गिरीधर रवीशंकर, वसंत सामंत, विवेक कामत, पुजा ठाकुर, अजित गरगट्टी, सुभेदार मेजर राकेशकुमार, निवृत्त कर्नल दीपक गुरूंग, व्यवस्थापक प्रा. डॉ. गोविंद वेलिंग, प्राचार्या मंजिरी रानडे उपस्थित होत्या.

यावेळी बोलताना कर्नल राजीव सहानी म्हणाले, एकता व शिस्त या मुल्यांवर एनसीसी आधारलेली आहे. देशभरातील सर्वात मोठी ही संघटना आहे. 60 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना लष्करी प्रशिक्षण दिले जाते. आयुष्य घडवायचे असेल तर विद्यार्थ्यांनी एनसीसीमध्ये सहभाग घेतलाच पाहिजे. एनसीसीमुळे एक नवी दिशा मिळते. त्यामुळे या संधीचे सोने करत एनसीसीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.

जगदीश कुंटे यांनी शाळेविषयी माहिती देत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीने शाळा प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. किरण ठाकुर यांची एसकेई सोसायटीच्या गव्हर्निंग कौंन्सिलच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल शाळेच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. शाळेचा माजी विद्यार्थी एनसीसी कॅडेट प्रथमेश पाटील याचाही शाळेच्यावतीने सत्कार करण्यात आला.

शिक्षिका चंद्रज्योती देसाई यांच्या ईशस्तवन व स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरूवात झाली. प्राचार्या मंजिरी रानडे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. सूत्रसंचालन रिबेका शेराफिम यांनी केले. प्रथमेश पाटील याने शाळेमध्ये एनसीसी सुरू केल्याबद्दल व्यवस्थापन मंडळाचे आभार मानून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी हेरवाडकर स्कूलच्या मुख्याध्यापिका वृंदा जिनराळ यासह शाळेचे शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

शाळेच्या माजी विद्यार्थ्याचे कर्नल सहानींकडून कौतुक

ज्ञान प्रबोधन मंदिर शाळेचा माजी विद्यार्थी प्रथमेश पाटील याने एनसीसीच्या माध्यमातून सर्वोत्तम कामगिरी केली आहे. त्याने 2019 च्या महापुराच्यावेळी लष्कराच्या खांद्याला खांदा लावत अनेक व्यक्तींचे जीव वाचविले आहेत. या कार्याची दखल घेऊन त्यांना रक्षा राज्यमंत्री पदक, महानिर्देशक पदक, चिफ सिनियर पदक अशा विविध पदांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यामुळे शाळेसोबतच आमच्या एनसीसी बटालियनलाही त्याच्यावर गर्व असल्याचे मेजर सहानी यांनी सांगितले.

Related Stories

तालुक्यात घुमला संयुक्त महाराष्ट्राचा गजर

Patil_p

स्पोर्टिंग फुटबॉल चषक स्पर्धेत एमएसडीएफ विजेता

Amit Kulkarni

वडगाव येथील बालकाचा डेंग्यूने घेतला बळी

Patil_p

तालुक्यात आठ महिने आधीच दिवाळी साजरी

Patil_p

ऐन हंगामात लॉकडाऊनमुळे जनावरांचे बाजार बंद

Patil_p

बेनाडीतील कुस्तीचा सुनील फडतरे मानकरी

Amit Kulkarni
error: Content is protected !!