तरुण भारत

सॅमसंग गॅलेक्सी एम52 मॉडेल 5-जी लाँच

वृत्तसंस्था/ मुंबई

सॅमसंग इंडियाने आपला मिड रेंजचा 5-जी स्मार्टफोन गॅलेक्सी एम52 मॉडेल 5-जीमध्ये सादर केला आहे. सॅमसंग गॅलेक्सी एम52 कंपनीचा एम आवृत्तीतला सर्वात शक्तीशाली स्मार्टफोन म्हणून ओळखला जात आहे. यामध्ये दमदार बॅटरीच्या मदतीने ग्राहकांना 81 तासांपर्यंत म्युझिक ऐकण्याची संधी मिळणार असून व्हॉईस कॉल 48 तास आणि 20 तासांपर्यंत व्हिडीओ पाहता येणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.

Advertisements

गॅलक्सी एम52 ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसोबत मिळणार आहे. यामध्ये 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा मिळणार आहे. सदरच्या मॉडेलची किमत भारतामध्ये 6जीबी रॅमसोबत 128 जीबी स्टोरेजसह 29,999 रुपये आहे. तर 8 जीबी रॅमसोबत 128 जीबी स्टोरेजच्या फोनची किमत 31,999 रुपये राहणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. सदरच्या फोनची विक्री ही सॅमसंगच्या संकेतस्थळावर ऑनलाइन होणार असून ऍमेझॉनवरही हा फोन विक्रीसाठी उपलब्ध आहे. आयसी ब्लू आणि ब्लेझींग ब्लॅक या दोन रंगात हा स्मार्टफोन येणार असल्याचे  कंपनीने सांगितले आहे. सदरच्या फोनला अँड्रॉइड बेसड वन युवन सिस्टीमची सोय असून 6.7 इंच फुल्ल एचडी सुपर एमोलेड डिस्प्ले याला आहे. तसेच सुरक्षेसाठी गोरीला ग्लास 5 ची सोय असून ऑक्टोकोर स्नॅपड्रगन 778 जी प्रोसेसर असेल.

Related Stories

नॉर्ड एन 10 5जी व नॉर्ड एन 100 दाखल

Patil_p

संगणक क्रांतीचे युग

tarunbharat

नोकीया 5.4 बाजारात दाखल

Omkar B

ऍपल आयफोन 12 ची किंमत

Patil_p

व्होडाफोन आयडियाची यशस्वी वेगवान 5 जी चाचणी

Patil_p

ओप्पोचे इ स्टोअर मेमध्ये होणार सुरू

Amit Kulkarni
error: Content is protected !!