तरुण भारत

सिंगापूरच्या लोकसंख्येत लक्षणीय घट

सिंगापूर/ वृत्तसंस्था

यंदाच्या जून महिन्यात सिंगापूरच्या लोकसंख्येमध्ये 4.1 टक्क्यांनी घट झाली आहे. केवळ एका महिन्यात एवढी घट कमी आतापर्यंत कधीही झालेली नव्हती. ही घट विशेषतः अनिवासी सिंगापूरवासियांच्या संख्येत झाली आहे. कोरोनामुळे अनिवासी सिंगापूर वासियांची संख्या घटली असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

Advertisements

सिंगपूरची लोकसंख्या सध्या 5.45 दशलक्ष इतकी आहे. 1970 पासून ती सातत्याने टप्प्याटप्प्याने कमी होत आहे. सिंगापूरचे स्थायी नागरिक असणाऱया संख्येतही गेल्या वर्षी 0.7 टक्के घट होऊन ती 35 लाखावर आलेली आहे. कोरोना काळात सिंगापूरने कठोर प्रवासी निर्बंध घातलेले होते. त्यामुळे येथे काम करण्यासाठी येणाऱया अस्थायी नागरिकांची संख्या घटली आहे. सिंगापूरमध्ये सलग 12 महिने राहणाऱया व्यक्तीस अस्थायी नागरिकाचा दर्जा देण्यात येतो. असे 4 लाख 90 हजार नागरिक या देशात असून त्यांच्या संख्ये 6.2 टक्के घट झाली आहे. सिंगापूरच्या नागरिकांचे सरासरी वय 42.2 वर्षावरून 42.5 वर्षे इतके झाले आहे. याचा अर्थ समाजात वृद्धांची संख्या वाढत आहे असा घेण्यात आला आहे.

Related Stories

कोरोनामुळे जगभरातील 50 कोटी लोक बेरोजगार

datta jadhav

कॅनडा भारताला करणार 10 दशलक्ष डॉलर्सची मदत

datta jadhav

85 टक्के अफगाणिस्तानवर ताब्याचा तालिबानचा दावा

Patil_p

कोरोना संसर्ग : फुफ्फुस अन् हृदय 3 महिन्यात आपोआप

Patil_p

आफ्रिकेतील देशात पसरला इबोला विषाणू

Patil_p

इजिप्तमध्ये बदल घडवून आणणारी सबा सक्र

Patil_p
error: Content is protected !!