तरुण भारत

भारतात नोकियाचे लॅपटॉप, स्मार्टटीव्ही दाखल

नवी दिल्ली

 नोकियाने भारतात प्योरबुक एस 14 लॅपटॉप आणि नवीन स्मार्ट टीव्ही सादर केला आहे. नव्या उत्पादनांची विक्री ही 3 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेलमधून खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. नोकिया प्योरबुक एस14 विंडोज 11 वर रन करता येणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. यात इंटेल कोर प्रोसेसर दिला आहे.

Advertisements

नोकिया प्योरबुक एस 14-नोकिया स्मार्ट टीव्ही

प्योरबुक एस14 लॅपटॉपची सुरुवातीची किमत 56,990 रुपये असून फ्लिपकार्टवर 3 ऑक्टोबरपासून खरेदी करता येणार आहे. तसेच नोकिया स्मार्ट टीव्ही क्यूएलइडी रेंज 50 इंच आणि 55 इंच डिस्प्लेमध्ये सादर केला असून याची सुरुवातीची किमत 49,999 रुपये राहणार आहे.

नोकिया प्योरबुक एस14चे स्पेसिफिकेशन

सदरचा लॅपटॉप विंडोज 11 वर रन होणार असून याचे वजन 1.4 किलोग्रॅम आहे. यामध्ये 11 जनरेशन इंटेल कोर आय5 सीपीयूसोबत इरीसएक्स इंटीग्रेट ग्राफिक्स आहे.

नोकिया स्मार्ट टीव्ही

सर्व स्मार्ट टीव्ही मॉडेल अँड्रॉईड 11 वर रन होणार असून क्यूएलइडी मॉडेल 50 इंच आणि 55 इंच डिस्प्लेत खरेदी करता येणार आहे. तसेच पूर्ण एचडी मॉडेल 43 इंच डिस्प्लेमध्ये खरेदी करता येणार आहे.

Related Stories

व्हॉट्सअ‍ॅपकडून ४६ दिवसात ३० लाख अकॉउंट बंद

Abhijeet Shinde

ब्रिटनने भारतासह अन्य देशांच्या मदतीने आखली 5-जी क्लब योजना

Omkar B

3 महिन्यात 5 कोटी स्मार्टफोन्सची जम्बो विक्री

Patil_p

‘लावा’ भारतात करणार 800 कोटींची गुंतवणूक

datta jadhav

चिनी मोबाईल कंपन्यांचे उत्पादन घसरले

Patil_p

विवोचे 2 स्मार्टफोन्स बाजारात दाखल

Amit Kulkarni
error: Content is protected !!