तरुण भारत

गंगावेस तालमीतील शड्डूंचा आवाज मंत्रालयात घुमला!

कोल्हापूर / संजीव खाडे

कुस्तीपंढरी कोल्हापुरातील शाहू विजयी गंगावेस तालीम आपल्या देशातील कुस्ती क्षेत्रात प्रसिद्ध असलेली तालीम. या तालमीतील बाल मल्लांच्या शड्डूंचा आवाज मंत्रालयात घुमला. अगदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनाही या शड्डूंच्या आवाजाने राजर्षी शाहू महाराजांच्या कुस्तीपंढरीची आठवण करून दिली.
तर या गोष्टीला निमित्त होत ते एका छायाचित्राचं. अर्थात फोटोचं. पुण्यातील एक हौशी छायाचित्रकार अरुण सहा पंधरा दिवसांपूर्वी कोल्हापुरात आले. त्यांच्या मनात एक वेगळा फोटो काढण्याचे घोळत होते. त्यांनी सकाळच्या प्रहरी थेट शाहू विजयी गंगावेस तालीम गाठली. हट के फोटो काढण्याच्या त्यांच्या विचारांना तालमीतील बाल मल्लांच्या सुरू असलेल्या कुस्तीच्या सरावाने बळ दिले.

सहा यांचा कॅमेरा क्लिक क्लिक करू लागला. गंगावेस तालमीच्या मुख्य प्रवेशद्वारातून आखाडÎात पडणारा कोवळा सूर्यप्रकाश कुस्तीचा सराव करणाऱया त्या बाल मल्लांच्या अंगावर आणि लाल मातीवर पडत असल्याचे छायाचित्र सहा यांच्या नजरेने आणि कॅमेऱयाने टिपले. जागतिक पर्यटन दिनानिमित्त आयोजित छायाचित्रण स्पर्धेसाठी ते छायाचित्र सहा यांनी पाठविले. कुस्तीची ताकद दाखविणाऱया या छायाचित्राला चक्क पहिल्या क्रमांकाचे बक्षीस लाभले. मंगळवारी जागतिक पर्यटन दिनी मुंबईत आयोजित कार्यक्रमात सहा यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी कोल्हापूरच्या शाहू विजयी गंगावेस तालमीतील हा फोटो असल्याचे समजल्यानंतर कोल्हापूरवर विशेष प्रेम असणाऱया मुख्यमंत्री ठाकरे यांनी सहा यांचे विशेष कौतुक केले. उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी कुस्तीच्या फोटोचे कौतुक करत कोल्हापूरच्या कुस्ती परंपरेला सलाम केला. सहा यांचा फोटो व्हायरल झाला. विशेष म्हणजे त्याचे कुस्ती जगतात कौतुकही झाले. गंगावेस तालमीच्या मल्ल आणि पदाधिकाऱयांनी त्यांचे अभिनंदन केले.

Advertisements

कोलकात्याचे अरुण सहा पुण्याचे जावई

अरुण सहा यांनी इंडियन एअरफोर्समध्ये (भारतीय वायूसेना) तब्बल सोळा वर्षे एरोनॉटिकल आणि टेक्निकल फोटोग्राफर म्हणून जबाबदारी पार पाडली. सेवानिवृत्तीनंतर ते पुण्यात हौशी छायाचित्रकार म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा, सर्वसामान्य माणूस यांची छायाचित्रे काढण्यासाठी ते राज्यभर दौरा करत असतात. व्यावसायिक फोटोग्राफी कंपनी काढण्याचा त्यांचा मानस आहे. अरुण सहा मुळचे कोलकाताचे (पश्चिम बंगाल) आहेत. पण पुण्यात स्थानिक झाले आहेत. त्यांचे सासर महाराष्ट्रीय जाधव कुटुंब आहे. घरी बंगाली, मराठी वातावरण आहे.

Related Stories

घोडावत गूळ कारखान्याकडून ऊसाला प्रतिटन २८४० रुपये दर जाहीर

Abhijeet Shinde

कोपार्डे ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भानामतीचा प्रकार

Abhijeet Shinde

लॉकडाऊन विरोधात व्यापारी रस्त्यावर

Patil_p

पुणे मेट्रो मार्गातील अडथळे हायकोर्टाकडून दूर

Rohan_P

लोककल्याणाचा वसा हा शाहू महाराजांचा अनुयय – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

Abhijeet Shinde

भूषणगडच्या हरणाईदेवीचा आज अष्टमीउत्सव

Patil_p
error: Content is protected !!