तरुण भारत

शिरसई सरपंचपदी गोकुळदास कांदोळकरांची निवड

वार्ताहर /थिवी

शिरसई पंचायतीची सभा ग्रामपंचायतीमध्ये होऊन गोकुळदास कांदोळकर यांची सरपंचपदी निवड झाली. गेल्या पंचायत निवडणुकीवेळी पंचायत मंडळात करार झाला होता की प्रथम 3 वर्षे आनंद टेमकर, पुढील 1 वर्ष दिनेश फडते व उर्वरीत वर्षासाठी गोकुळदास कांदोळकर. त्या करारानुसार दिनेश फडतेनी आपला कार्यकाळ संपल्यावर आपल्या पदाचा राजीनामा दिला व गोकुळदास कांदोळकरांना सरपंच पदाची वाट मोकळी करून दिली.

Advertisements

सरपंच निवडणुकीला दिनेश फडते, आनंद टेमकर, गोकुळदास कांदोळकर, गीतीशा कांदोळकर व उपसरपंच रेश्मा पार्सेकर उपस्थित होते तर लक्ष्मीकांत परब व विराज गडेकर अनुपस्थित राहिले. ही पंचायत गोवा फॉरवर्डजवळ असून गोवा फॉरवर्डचे कार्यकारी अध्यक्ष व माजी आमदार किरण कांदोळकर तसेच गोवा फॉरवर्डच्या उमेदवार कविता कांदोळकर उपस्थित होत्या. किरण कांदोळकर यांनी पुष्हार घालून नवनिर्वाचित सरपंचाचे अभिनंदन केले.

सरपंच यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले की, ते काही पंचायतीत नवीन नाहीत. 2 वेळा त्यांनी सरपंचपद भूषविले असून ते तीसऱयावेळी सरपंचपदी अरूढ झालेत. गावच्या सर्वांगीण विकासासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करतील. सरकारने त्याच्या आख्यातील परिसरातील पेट्रोल पंपवरील ओकस्ट्रोय 5 टक्के टॅक्स दिला असता तर पंचायतीच्या तिजोरीत भर पडून पंचायतीचा सर्वतोपरी उद्धार झाला असता. पंचायतीला महसूल कमी प्रमाणात मिळत असल्याने व फक्त घर टॅक्सवर गावचा सर्वतोपरी विकास साधता येत नाही. असे ते म्हणाले.

गोवा फॉरवर्डचे कार्यकारी अध्यक्ष म्हणाले की, सध्या भाजपच्या नेत्यांना कोविड झालीय आणि यापुढे कोणत्या नेत्यांना कोविड होईल सांगणे कठीण. भाजप सरकारने ग्रामीण भागातील पेट्रोल पंपचा ऑकस्ट्रोय टॅक्स हटवून ग्रामपंचायतीना मोठी नुकसान केली आहे. सरकार सध्या सरकार तुमच्या दारी योजना राबविते त्या योजनांचा किती लोकांना फायदा झाला विचारा. केवळ घोणषा बाजी करून चालत नाही योदना राबविण्यात येतात त्याचाच फायदा गरीब लोकांना व्हावा. सर्व गावातील आखऱयातील पेट्रोल  पंपाना पाच टक्के टॅक्स पंचायतीना द्या म्हणजे पंचायतीचा महसूल वाढेल.

निवडणूक अधिकारी म्हणून गिरीश कुमार तारी यांनी काम पाहिले तर त्यांना मदत सचिव झेनित डिकोस्ताने व कारकून सुर्यकांत कारापूरकर यांनी केली.

Related Stories

कर्नाटकातील कोरोना उद्रेकाचा परिणाम मुरगाव बंदरावर

Patil_p

निवडणूक गोवा फॉरवर्डतर्फे काणकोण मतदारसंघातून लढविणार

Patil_p

मडगाव घाऊक मासळी मार्केट सकाळी 9 बंद

Patil_p

नाटय़ कलाकार गुरुवर्य दामोदर (भाई) शेवडे यांचा 7 रोजी सत्कार

Amit Kulkarni

कोरोनाच्या तिसऱया लाटेसह म्युकोरमायकोसीसचा सामना करण्यास सज्ज

Omkar B

डिचोलीत रविवारी संभाजीराव भिडे गुरूजींची महासभा

Amit Kulkarni
error: Content is protected !!