तरुण भारत

मंत्री मायकल लोबो यांना काँग्रेसची तिकीट दिल्यास आम्ही त्यांच्याबरोबर राहणार नाही

माजी आमदार आग्नेल फर्नांडिस यांनी दिली राहूल गांधीना माहिती : गांधीशी चर्चेनंतर आग्नेल परतले राज्यात

प्रतिनिधी /म्हापसा

Advertisements

आपण काँग्रेस प्रमुख राहूल गांधी यांना स्पष्ट सांगितले आहे की जर मंत्री मायकल लोबो यांना कळंगुटमधून काँग्रेसची तिकीट दिली तर आम्ही त्याच्याबरोबर राहणार नाही अशी स्पष्ट माहिती माजी आमदार तथा काँग्रेसचे प्रवक्ते आग्नेल फर्नांडिस यांनी दै. तरुण भारदतला दिली. फर्नांडिस राहूल गांधी यांची भेट घेऊन राज्यात परतल्यावर या प्रतिनिधीने त्यांची भेट घेतली असता त्यांनी वरील माहिती दिली. त्यांनी स्पष्ट सांगितले आहे की मंत्री मायकल लोबोना आम्ही पक्षात कोणत्याही परिस्थितीत घेणार नाही.

राजकीय घडामोडीत काही होऊ शकते. उद्या वरिष्ठ नेत्यानी जोसेफ सिक्वेरा तुम्हाला अँथोनी मिनेझीस या सर्वांना एकत्रित येऊन लोबोना पाठिंबा द्या असे सांगितल्यास तुमची भूमिका काय असेल असे विचारल्यावर माजी आमदार आग्नेल फर्नांडिस म्हणाले की, मंत्री मायकल लोबो यांची आयडोलोजी पक्षश्रेष्ठींना कधीच पटणार नाही. लोबोनी गाव संपविला आहे. पीडीए वा आदी सर्व आणून त्यांनी सर्वकाही संपवून टाकले आहे. कांदोळी, काँग्रेस लोक मायकल विरोधात भांडतात. आम्ही एकत्रित तिघे जाऊन तेथे काहीच उपयोग होणार नाही कारण ते तेथे कशीच मते देणार नाही. कारण लोक तेथे नाही तर आम्ही तेथे जाऊन काय उपयोग. आपल्यास दिसत नाही काँग्रेस त्यांना तिकीट देणार म्हणून. आज महागाई वाढली असली तरी लोक या निवडणुकीत भाजपला धडा शिकविणारच यात काहीच शंका नाही. आपण कळंगुटच्या तिकीटासाठी प्रयत्न करीत आम्ही काँग्रेसजन आहे. आपली बोलणी झाली त्यानुसार तिकीट आपल्यासच देणार असे सांगून आग्नेल म्हणाले की, काही घडामोडी झाल्या तर आम्ही काँग्रेसबरोबरच राहणार फक्त मायकल लोबोना वगळून असे ते म्हणाले. टीएमसीचा प्लेन काहीच कळत नाही जे निवडणुकीपूर्वी दोन तीन महिने पूर्वी येतात. पूर्वी दोतोर, चर्चील याना बसविले मात्र नंतर ते गायब झाले. राज्यात त्याचे स्वागत आहे असे ते म्हणाले.

संधी साधून बाजूला ठेवणार

राज्यातील घडामोडीची माहिती जाणून घेण्यासाठी काँग्रेस प्रमुख तथा सर्वेसर्वा राहूल गांधीनी आपल्यास दिल्लीला पाठविले होते. त्यामुळे आपली भेट त्यांच्याशी झाली असल्याची माहिती कळंगुटचे माजी आमदार तथा प्रवक्ते आग्नेल फर्नांडिस यांनी दिली. तिकीटाचे बोलणे झाले मात्र एकूण परिस्थितीचा आढावा त्यांनी घेतला. काँग्रेसमध्ये खूप लोक येतात आणि ते यायलाही पाहिजे असे आपण गांधीना सांगितले आहे. मात्र काहीजण फक्त काँग्रेसमध्ये तिकीट घेण्यासाठीच प्रवेश करतात असे ते म्हणाले. हे राहूल गांधींना पटले असून त्यांनी स्पष्ट केले आहे. जे कोणी तिकीटासाठीच संधी साधू घेऊ पाहतात त्यांना आम्ही बाजूला ठेवणार आहोत.

लुईझीनला यापूर्वीच प्रदेशाध्यक्षपदी ऑफर दिली होती

आज कॉग्रेसमधील नेते सोडून जात आहे यावर आपले मत काय असा प्रश्न आग्नेल फर्नांडिस यांना केला असता ते म्हणाले आपण यापूर्वीच सांगितले आहे. लुईझीन फालेरो यांना वाटते आप्ल्यास काँग्रेसमध्ये कुणीही आदर करीत नाही. यैवर राहूल गांधी म्हणाले, आपण त्यांना प्रदेशाध्यक्षपदाची ऑफर दिली होती मात्र त्यांनीही नाकारली. लुईझीन वरिष्ठ नेते आहे. ते का सोडून गेले हे त्यांनाच विचारावे असे फर्नांडिस म्हणाले.

पॉवर आहे तेथे पक्षांतर होते

मागे भाजप आले तेव्हा सर्व भाजपमध्ये गेले. थोडे पॉवर आहे तेथे धआवतात. अँथोनी मिनेझीसही दिल्लीस जाऊन काँग्रेस प्रवेश केला असला तरी काँग्रेस पक्षात  अशी माणसे आम्हाला पाहिजेच आहे. हळूहळू कळंगुटमधील अन्य काही नेते काँग्रेस प्रवेश करणार आहेत. उद्या मला तिकीट देत नाहीत तर मी काँग्रेसलाच कार्य करेन. अवघ्या पाच महिन्यात प्रवेश करतात त्यांना तिकीट दिली तर कसे होणार. काँग्रेस पक्षात येऊन काम करायला पाहिजे. आम्ही सदैव पक्षासाठी काम केले आहे. गेल्यावेळी जोसेफ सिक्वेरा बरोबर काँग्रेस पक्षाला आम्ही सहकार्य केले असल्याची माहिती आग्नेल फर्नांडिस यांनी दिली.

Related Stories

एफसी गोवाच्या एदू बेडियाला शिस्तपालन समितीची नोटीस

Amit Kulkarni

काँग्रेसच्या दहा फुटीरांसह सभापतींनाही नोटीस

Omkar B

आंदोलकांना मारणे म्हणजे आंदोलन हाताळणे नव्हे!

Patil_p

सरकारकडून सत्तरीतील शेतकऱयांची थट्टा

Amit Kulkarni

पेडणे तालुक्यात झाडांची पडझड

Patil_p

वाळपईत धावत्या कदंबा बसला आग

Patil_p
error: Content is protected !!