तरुण भारत

हायपर डायड्रेसिस म्हणजे काय

वैद्यकीय भाषेत सांगायचे तर अतिघाम येणे या समस्येला हायपरहायड्रोसिस म्हटले जाते. दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसात आणि ऑक्टोबर हिटमध्ये अनेकांना या समस्येचा सामना करावा लागतो.

यामध्ये पायाचे तळवे, हाताचे तळवे, चेहरा आणि काख अशा शरीराच्या काही भागांत अति घाम येतो, सहसा घाम न येणार्या जागी घाम येऊ शकतो.  

Advertisements

अतिघाम येण्याला शरीरातील नसांचे अतिकृतीशील असणे कारणीभूत असते. त्यामुळे घर्मग्रंथी अति कार्यरत झाल्याने आपल्याला घाम अधिक येतो. काही वेळा औषधे, मेनापॉझ, स्थूलता, रक्तशर्करेचे कमी प्रमाण, थायरॉईडची समस्या, हृदयाचा झटका, मलेरिया किंवा क्षयासारखे संसर्गजन्य आजार त्याशिवाय पोषक तत्त्वांची कमतरता याचा परिणाम म्हणूनही अशा संसर्गजन्य रोगांमुळेही अतिघाम येण्याची समस्या निर्माण होऊ शकते. त्याशिवाय पोषकतत्वांची कमतरता असणारा आहार आणि अस्वच्छ जीवनशैली यांच्यामुळे अतिघामाची ही समस्या उद्भवू शकते.

  • हायपरहायड्रोसिसमुळे अनेक समस्या येतात. काखेत अतिघाम येत असल्याने सतत कपडे बदलत रहावे लागते. हाताच्या तळव्यांना घाम येत असल्याने हात मिळवणेही टाळावे लागते. तसेच अतिघामामुळे सामाजिक स्तरावर कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होताना विचार करावा लागतो. लोकांत मिसळण्याची लाज वाटू शकते. काम करताना हात ओलसर राहिल्याने पेन धरुन लिहीण्यासही समस्या निर्माण होते.  थोडक्यात ा हायपरहायड्रोसिस मुळे आपल्या दिनक्रमात वेगळ्याच अडचणी येतात आणि त्यांना सामोरे जाताना धांदल उडते. अर्थातच हायपरहायड्रोसिसचा आपल्या जीवनशैलीवरही परिणाम होतो.
  • अनेकदा घरच्या घरी केलेल्या उपायांनी ह्या समस्येचे उपाय मिळू शकतात.
  • यासाठी आंघोळीच्या पाण्यात लिंबाचा रस मिसळा. याखेरीज एक चमचाभर बेकिंग सोडा घेऊन त्यात ताजा लिंबाचा रस टाकून हे मिश्रण जिथे अधिक घाम येतो त्या जागी लावा. दहा मिनिटांनंतर ती जागा स्वच्छ धुवा. दिवसातून एकदा तरी हा उपाय अवश्य करा. मात्र हे मिश्रण धुवून टाकल्यावर लगेचच तीव्र सूर्यप्रकाशात जाणे टाळा कारण लिंबामुळे त्वचा संवेदनशील झालेली असते त्वचेला सूर्यप्रकाशाचा त्रास होऊ शकतो.
  • आक्रोड अतिघामाच्या समस्येचे निराकरण करण्यास उपयोगी पडते. त्यातील दुर्गंध कमी करण्याची क्षमता आणि अस्ट्रींजंट गुणधर्म यामुळे घाम नियंत्रित होऊ शकतो. त्यातील टॅनिक ऍसिड घर्मबिंदू निर्माण करणारी रंध्रे बंद करतात. त्यामुळे अति घाम येण्यास मज्जाव होतो. ङहायपरहायड्रॉसिस ही समस्या बर्याचदा अनुवांशिक असते. ज्या व्यक्तींना ही समस्या असते त्यांच्या घरात भावंड किंवा पालक यांच्यापैकी कोणालातरी याच पद्धतीची समस्या भेडसावत असते त्यामुळे ही समस्या आपल्याकडे पिढीजात स्वरुपातही आलेली असू शकते.

Related Stories

पोटातील क्षयरोगाचे आवाहन

Amit Kulkarni

सुकामेवा खातंय

Amit Kulkarni

हिवाळ्याचा ‘आघात’

Omkar B

घाम येतोय ?

Omkar B

लाहानबाळांचा पचनसमस्या

Amit Kulkarni

लस आवश्यकच: पण …..

Omkar B
error: Content is protected !!