तरुण भारत

अड्रेनल फटीगचा अंतरंगात

आत्यंतिक व्यस्त वेळापत्रकामुळे आपल्याला थकल्याची, दमल्याची भावना निर्माण होते. शरीरातील सर्व शक्ती, उर्जा संपून गेल्यासारखे वाटते. आपल्या येणारा हा थकवा, झोपेच्या समस्या आणि सांधेदुखी यामागे ऍड्रेनल फटीग हे कारण असू शकते.

  • तणावाचे प्रमाण वाढले की कॉर्टिसोलची पातळी वाढते आणि शरीरक्रिया मंदावतात. त्यामुळे ऍड्रेनल म्हणजे मूत्राशयाजवळील संप्रेरके तयार करणार्या ग्रंथींना त्रास होतो.
  • हे टाळण्यासाठी पोषक आहार घेणे, पुरेश्या प्रमाणात पाणी पिणे, दूधाचे पदार्थ आणि खनिजे यांचा रोजच्या आहारात समावेश करावा.जेवणाचा पुरेपूर आनंद घ्यावा.
  • चिंता आणि नैराश्य हे तणावाशी थेट निगडीत असल्यामुळे तणाव कसा नियंत्रित करता येईल किंवा कसा कमी करता येईल यावर काम करावे.
  • तणावामुळे शरीराला पुरेसा आराम मिळत नाही. तेव्हा अंगदुखी आणि शरीर आखडते. तसेच पाठ, मान यांच्यावरही ताण येतो. यासाठी आपल्या झोपेच्या सवयी बदलून पहा आणि योग तसेच ताणाचे व्यायाम करा. त्याशिवाय गरम पाण्याने अंघोळ केल्यास शरीराची आग कमी होते. कारण नैसर्गिकरित्या असलेले मॅग्नेशियम स्नायूंच्या वेदना कमी करते. तसेच शरीर स्वच्छताही करते त्यामुळे शरीर समतोल राहते.
  • दिवसभराच्या थकव्यामधून आराम करायला आणि पुन्हा उर्जा मिळण्यासाठी शांत झोपेची नितांत गरज असते. झोप पुरेशी झाली नाही तर त्याचा आरोग्यावर आणि कामावर परिणाम होतो आणि निद्रानाशाचा त्रास होऊ शकतो.
  • व्यायाम केल्याने शरीराला उर्जा मिळते पण अतिश्रम केल्याने येणारा शारिरीक तणाव ऍड्रेनल फटिगला आमंत्रण देतो. कारण अतिश्रमाचा शरीरावर नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे अतिश्रमापेक्षा हलके व्यायाम करावेत. चालणे, योग हे उत्तम पर्याय. समजा आपल्याला वजन कमी करायचे आहे म्हणून व्यायाम करत असाल तरीही आपल्या आहारावरील नियंत्रणामुळे 80 टक्के परिणाम वजन कमी होताना दिसून येतात.
  • ऍड्रेनल फटीगच्या दुसर्या टप्प्यात थायरॉईड ग्रंथींना इजा होऊ शकते. त्यामुळे हायपोथायरॉईडची लक्षणे आपल्याला दिसू लागतात. त्यात वजन वाढणे, केस कोरडे पडणे आणि त्वचा कोरडी पडणे यांसारखी लक्षणे दिसू शकतात.ऍड्रेनल ग्रंथी आणि तणावाच्या पातळीतील असमतोलामुळे संप्रेरके तयार होण्यासाठी आवश्यक असणारे सर्व घटक कॉर्टीसोलच्या निर्मितीत गुंततात. एखादी स्त्री खूप काळ तणावात राहत असेल तर मासिक पाळीचे चक्रही बिघडू शकते.

Related Stories

कोविड काळात अल्झायमर

Amit Kulkarni

जपा किडनीचे आरोग्य

tarunbharat

गर्भनलिकेतून कोरोनसंसर्ग

Omkar B

किडनी विकार आणि कोरोना

Omkar B

लक्षण दिसत नसल्यामुळे

Amit Kulkarni

डेंटल कॅपच्या अंतरगात….

Omkar B
error: Content is protected !!