तरुण भारत

मॉर्निंग वॉक करताना

आरोग्यासाठी चालण्याचे महत्त्व आता सर्वांनाच ज्ञात झाले आहे. त्यामुळे हल्ली मॉर्निंग वॉकला जाणार्यांची संख्या वाढलेली दिसते; मात्र काही जण मॉर्निंग वॉक करताना मोबाईल फोनचा वापर करताना दिसतात. काही जण वॉक करताना गाणी ऐकतात, तर काही जण फोनवर बोलत चालतात. पण हे सर्वथा चुकीचे आहे. किंबहुना यामुळे चालण्याचे फायदे मिळण्याऐवजी आरोग्याला अपाय होऊ शकतो.

  • वास्तविक पाहता, मोबाईलच्या अतिवापराचे किती तोटे आहेत हे आपण जाणतोच. त्यामुळे किमान चालताना, व्यायाम करताना तरी मोबाईलपासून दूर राहिले पाहिजे. पण अनेकांना गॅजेटस्चा मोह सोडवत नाही; तर काही जण स्टाईल म्हणूनही हेडफोन, ईअरफोनचा वापर करत मॉर्निंग वॉक घेताना दिसतात. पण 40-45 मिनिटे कानाला हेडफोन वा मोबाईलचा वापर करण्याने ऐकण्याच्या क्षमतेवर प्रतिकूल परिणाम होतो.
  • दुसरी गोष्ट म्हणजे, चालताना पाठीचा कणा नेहमी सरळ असणे गरजेचे असते; पण मोबाईल वापरतो तेव्हा आपले सर्व लक्ष फोनवर असते. पाठीचा कणा सरळ राहत नाही. बराच वेळ असे चालत राहिल्यास शरीराची मुद्रा खराब होते.
  • तिसरे म्हणजे, चालताना तुमचे संपूर्ण शरीर सक्रिय असते आणि संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो, पण तुम्ही एका हातात मोबाईल धरून चालत असाल तर ते स्नायूंमध्ये असंतुलन निर्माण करते. यामुळे स्नायूंमध्ये वेदना होऊ शकते.
  • जेव्हा तुम्ही मॉर्निंग वॉक दरम्यान मोबाईल फोन वापरता, तेव्हा तुमचे लक्ष पूर्णपणे चालण्याकडे नसते. यामुळे चालण्याचा पूर्ण लाभ मिळत नाही.
  • दीर्घकाळ मॉर्निंग वॉक करताना ही सवय कायम ठेवली तर यामुळे पाठदुखी होऊ शकते. त्यामुळे चालताना मोबाईल अजिबात वापरू नका.

Related Stories

पतंजली आज लाँच करणार कोरोनावरील औषध

datta jadhav

फायदे वेट ट्रेनिंगचे

Amit Kulkarni

कच्चे दूध पिताय ?

Omkar B

‘COVAXIN’ च्या मानवी चाचणीस सुरुवात

datta jadhav

चहा आणि कोरोना

Omkar B

मधुमेह निदानासाठी तपासण्या

Omkar B
error: Content is protected !!