तरुण भारत

सलग तिसऱया सत्रात घसरण कायम !

सेन्सेक्स 287 तर निफ्टी निर्देशांक 93 अंकांनी प्रभावीत

वृत्तसंस्था /मुंबई

Advertisements

भारतीय शेअर बाजार सलग तिसऱया सत्रातही घसरणीसह बंद झाला आहे. यामध्ये चालू आठवडय़ात मंगळवारपासून आतापर्यंत म्हणजे गुरुवारच्या सत्रापर्यंत बाजार घसरणीसह बंद झाला आहे. निर्देशांकाला मजबूती प्राप्त करून देणाऱया कंपन्यांपैकी रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस आणि आयसीआयसीआय बँक यांचे समभाग प्रामुख्याने घसरणीसह बंद झाले आहेत.

प्रमुख कंपन्यांच्या मदतीने दिवसभरात सेन्सेक्समध्ये चढउताराचे वातावरण राहिल्याने दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 286.91 अंकांसह 0.48 टक्क्यांनी घसरुन 59,126.36 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 93.15 अंकांसोबत 0.53 टक्क्यांनी प्रभावीत होत 17,618.15 वर बंद झाल्याचे पहावयास मिळाले आहे.

सेन्सेक्समधील मुख्य कंपन्यांपैकी पॉवरग्रिडचे समभाग सर्वाधिक तीन टक्क्यांनी नुकसानीत राहिले असून अन्य कंपन्यांमध्ये एशियन पेन्ट्स, ऍक्सिस बँक, कोटक बँक, बजाज ऑटो, स्टेट बँक आणि महिंद्रा ऍण्ड महिंद्रा यांचे समभाग घसरणीत राहिले आहेत. दुसऱया बाजूला बाजारात बजाज फिनसर्व्ह, एनटीपीसी, सनफार्मा आणि हिंदुस्थान युनिलिव्हर यांचे समभाग तेजीत राहिले आहेत.

सप्टेंबर महिन्याचा हा अखेरचा आठवडा असल्याने बाजारात चढउताराचे वातावरण राहिले होते. यासह जागतिक पातळीवर आशियातील अन्य बाजारांपैकी शांघाय आणि सिओल हे लाभात राहिले असून हाँगकाँग आणि टोकीओ घसरणीत राहिले. तर युरोपीयन बाजार दुपारपर्यंत तेजीत राहिल्याचे दिसून आले आहे.

कच्च्या तेलाची स्थिती

आंतरराष्ट्रीय पातळीवर मात्र कच्च्या तेलाच्या किमती बुधवारी घसरल्या होत्या. तसेच बेंट क्रूड 2.25 डॉलरने कमी होत 78.64 डॉलर प्रति बॅरेलवर आले होते. गुरुवारी जागतिक बाजारात कच्चे तेल 0.24 टक्क्यांनी वधारुन 78.28 डॉलर प्रति बॅरेलवर पोहोचले आहे.

समभाग वधारलेल्या कंपन्या

 • बजाज फिनसर्व्ह 17810
 • बजाज फायनान्स 7670
 • एनटीपीसी….. 141
 • सन फार्मा…… 818
 • हिंदुस्थान युनि 2700
 • टायटन…….. 2159
 • एचडीएफसी. 2754
 • एचडीएफसी बँक 1595
 • डॉ. रेड्डीज लॅब 4885
 • टाटा पॉवर….. 158
 • अशोक लेलँड… 133
 • बजाज होल्डींग्स 4815
 • डीएलएफ……. 417
 • हॅवेल्स इंडिया 1377
 • एमआरएफ. 79386
 • एसबीआय लाईफ 1208

समभाग घसरलेल्या कंपन्या

 • पॉवरग्रिड कॉर्प 189
 • एशियन पेन्ट्स 3244
 • ऍक्सिस बँक…. 766
 • बजाज ऑटो.. 3832
 • स्टेट बँक……… 453
 • कोटक महिंद्रा 2004
 • आयसीआयसीआय 700
 • महिंद्रा ऍण्ड महिंद्रा 801
 • टेक महिंद्रा… 1380
 • लार्सन ऍण्ड टुब्रो 1703
 • इन्फोसिस…. 1675
 • अल्ट्राटेक सिमेंट 7395
 • इंडसइंड बँक. 1113
 • आयटीसी……. 235
 • भारती एअरटेल 688
 • मारुती सुझुकी 7331
 • टाटा स्टील… 1288
 • टीसीएस…… 3774
 • रिलायन्स इंडस्ट्रीज 2517
 • नेस्ले………. 19415
 • एचसीएल टेक 1279
 • पिराल एन्टर. 2590
 • आयशर मोर्ट्स 2791
 • टोरंटो फार्मा. 3076
 • हिरोमोटो कॉर्प            2833

Related Stories

तिसऱया दिवशी शेअर बाजारात पुन्हा तेजी

Patil_p

विप्रो कंपनीच्या सीईओपदी थेरी डेलापोर्टे यांची

Patil_p

आयओसी नव्या पाईपलाईनसाठी 9,028 कोटीची करणार गुंतवणूक

Patil_p

टेस्लाचे एलॉन मस्क बनले जगातील धनाढय़

Patil_p

स्पाईस जेटच्या ताफ्यात लवकरच 20 विमाने

Patil_p

बँकांच्या समभाग विक्रीने बाजारात घसरण

Patil_p
error: Content is protected !!