तरुण भारत

..म्हणून जन्मदात्या बापाने मुलाच्या डोक्यात घातली कुऱ्हाड

तालुका प्रतिनिधी / अक्कलकोट

अक्कलकोट तालुक्यातील कलप्पावाडी येथे जन्मदात्या बापाने २८ वर्षीय मुलाच्या डोक्यात कुऱ्हाड घालून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रघुनाथ राजेंद्र जानकर असे या मृत मुलाचे नाव आहे. ही घटना काल, गुरुवार दि ३० रोजी घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मयत मुलगा रघुनाथ जानकर हा आपले वडील राजेंद्र रघुनाथ जानकर (वय ४९) यांच्याकडे दारूच्या नशेत मला ट्रॅक्टर घ्यायचे आहे, तुम्ही शेत विकून ५ लाख रुपये द्या असे म्हणून शिवीगाळ करु लागला. तेव्हा आरोपी राजेंद्र जानकर यांनी रघुनाथ यास मी शेत विकून पैसे देत नाही तुला काय करायचे आहे ते कर ! असे बोलल्यानंतर मुलाने वडिलांची कॉलर पकडली. त्यावेळी आरोपीने त्यास ढकलून देत कुऱ्हाडीने मयत रघुनाथ याच्या डोक्यात जोराने घाव घातले. असता तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. व परत त्याच्या पाठीत व डोक्यात कुऱ्हाडीने वार केले. वडील आरोपी राजेंद्र रघुनाथ जानकर यांच्या विरोधात मंगलदास राजेंद्र जानकर यांनी दक्षिण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला केला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बी. एच. काकडे हे करीत आहेत.

Related Stories

सोलापूर शहरात 64 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण, चौघांचा मृत्यू

Abhijeet Shinde

पवार थांबले… राजकारणाच्या नव्हे तर खुल्या आसमानाखालच्या लग्नाच्या मांडवात..!

Abhijeet Shinde

माढा तालुक्यातील रोपळेत महिला वैद्यकीय अधिकाऱ्याला धमकी; गुन्हा दाखल

Abhijeet Shinde

पेट्रोल दरवाढी विरोधात आम आदमीच्यावतीने निदर्शने

Abhijeet Shinde

एनआयएच्या अर्जावर आज सुनावणी

prashant_c

सोलापूर जिल्हा शल्य चिकित्सकपदी डॉ. अशोक बोल्डे

Abhijeet Shinde
error: Content is protected !!