तरुण भारत

एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत पुन्हा वाढ

नवी दिल्ली/प्रतिनिधी

पेट्रोलियम कंपन्यांनी आता व्यावसायिक लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस अर्थात एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत ४३ रुपयांची वाढ केली आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरचा वापर हा हॉटेल्स, ढाबे आणि सार्वजनिक भोजनालयांमध्ये अधिक होतो. त्यामुळे, आता दर वाढल्याने हॉटेलिंग महाग होऊ शकतं. दरम्यान, सर्वसामान्यांसाठी दिलासा देणारी बाब म्हणजे विनाअनुदानित घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमती ८८४.५० रुपयांवर स्थिर आहेत.

एलपीजी सिलेंडरच्या किंमतीतील या वाढीनंतर, आता दिल्लीतील १९ किलोच्या व्यावसायिक प्रति सिलेंडरची किंमत आता १७३६.५० रुपये झाली आहे. हे नवीन दर आजपासून लागू होतील. त्यामुळे, आजपासूनच (१ ऑक्टोबर) व्यावसायिक गॅस सिलेंडर खरेदी करताना जास्त किंमत मोजावी लागणार आहे. तर, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरांमध्ये मात्र कोणताही वाढ झालेला नाही. त्यामुळे, घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर स्थिर आहेत. सर्वसामान्यांना नक्कीच काहीसा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, यापूर्वी अवघ्या महिन्याभरापूर्वी म्हणजेच १ सप्टेंबर रोजी व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत ७५ रुपयांची वाढ करण्यात आली होती.

Advertisements

Related Stories

पुंछमधील चकमकीत जेसीओसह 5 जवान शहीद

datta jadhav

कोरोना नियंत्रणासाठी महिलांचा पुढाकार

Patil_p

देशात 14.77 लाख उपचारार्थ रुग्ण

datta jadhav

मोदी-ममता दोघेही निशाण्यावर

Patil_p

गुजरात : 18 शहरांमध्ये रात्री 10 ते सकाळी 8 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू !

Rohan_P

पतीकडून पत्नीचा धारधार शस्त्राने खून

Abhijeet Shinde
error: Content is protected !!