तरुण भारत

पंतप्रधान मोदींशी पंजाब मुख्यमंत्र्यांची चर्चा

नवे कृषी कायदे मागे घेण्याचा केला आग्रह

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisements

पंजाबचे नवे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. केंद्राने नवे कृषी कायदे त्वरित मागे घ्यावेत, अशी मागणी आपण पंतप्रधान मोदींकडे केली, असे त्यांनी नंतर वृत्तप्रतिनिधींना स्पष्ट केले.

कायदे मागे घेण्याबरोबरच पंजाबमध्ये केंद्र सरकार त्वरित भाताची खरेदी सुरू करावी, अशीही मागणी त्यांनी केल्याचे समजते. भाताची खरेदी 10 ऑक्टोबरपर्यंत लांबणीवर टाकण्यात आली आहे. आंदोलक शेतकऱयांशी केंद्र सरकारने त्वरित वाटाघाटी सुरू कराव्यात, असे प्रतिपादन त्यांनी केल्याचे समजते.

सिद्धूंचा मुद्दा टाळला

पंजाब काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेले नवज्योतसिंग सिद्दू यांच्या बरोबरचे मतभेद संपले आहेत काय? असा प्रश्न पत्रकारांनी त्यांना केला असता त्यांनी उत्तर देण्याचे टाळले. आपण पंतप्रधान मोदींशी बोलण्यासाठी येथे आलो असून याविषयावरील प्रश्नांना उत्तरे देऊ असेही त्यांनी पत्रकारांना ऐकविले.

Related Stories

पंजाब काँगेसमध्ये सिद्धूंना वाढता विरोध

Patil_p

असॉल्ट रायफल्सची अमेठीत निर्मिती

Patil_p

दिल्लीचे सीरो सर्वेक्षण, देशासाठी ‘गूड न्यूज’

Patil_p

प्रजासत्ताक दिन : फ्लाय पास्टमध्ये अपाचे हेलिकॉप्टरचा सहभाग

Patil_p

बिहार : लग्नानंतर दोन दिवसातच वराचा मृत्य; लग्नातील 95 पाहुणे कोरोना पॉझिटिव्ह

Rohan_P

जम्मू काश्मीर : वैष्णो देवी मंदिर परिसरात भीषण आग

Rohan_P
error: Content is protected !!