तरुण भारत

आरोग्य विभागाचा कारभार काही केल्या सुधारेनाच

नगराध्यक्षांच्या आदेशानुसार शाहुनगरातील घंटागाडीचा ठेकेदार बदलला

प्रतिनिधी/ सातारा

Advertisements

ज्यावेळी विषय समितीच्या सभापती निवडी झाल्या त्यावेळी शेवटची टर्म आहे म्हणून खासदार उदयनराजेंकडे ज्यांनी सध्याचा जो फॉर्म्युला मांडला तो आता चांगलाच गोत्यात येवू लागला आहे. कारण मुदतवाढ दिलेल्या आरोग्य विभागाला सुरुवातीपासून काही चांगले काम नव्हते. त्या विभागात सगळा गोतावळाच सुरु होता. गेल्या दोन महिन्यापासून घरगुती कारणास्तव या विभागाच्या पदाधिकारी केबीनकडे फिरकेनात अशी स्थिती आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या तक्रारी वाढल्या असून गेल्या दोन महिन्यात आरोग्य समितीची बैठकही नाही तर दोन महिन्यापासून फाईलवर सह्या झाल्या नाहीत, अशी जोरदार चर्चा पालिकेत सुरु आहे.

प्रथमच खासदार उदयनराजेंनी पालिकेत विषय समितीच्या निवडी करताना सगळय़ा केवळ उपाध्यक्ष वगळता सर्व महिला असे समिकरण केले. परंतु हे समिकरण ज्यांनी त्यांच्याकडे मांडले व ते अंमलात आणले गेले तेच गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनू लागला आहे. सातारा पालिकेत आरोग्य विभागात सगळा गोतावळाच गेल्या वर्षभर सुरु होता. आता केडरचे अधिकारी आले तर पदाधिकारीच केबीनकडे फिरकत नाहीत. त्यांच्या घरगुती कारणास्तव त्या पालिकेकडे येत नाहीत, अशी चर्चा आहे. परंतु सातारा पालिकेत आरोग्य विभाग हा महत्वाचा विभाग आहे. शहरात अनेक ठिकाणी कचऱयाची समस्या आहे. गटर तुंबले गेले आहेत. त्या समस्या सोडविण्याकडे प्राधान्य देणे गरजेचे आहे. पण गेली दोन महिन्याच्या अनेक फाईल्स सहीवाचून थांबल्याची चर्चा सुरु आहे. तसेच या विभागात काही कर्मचारी असूनही बिनकामाचे आहेत. ते पालिकेच्या तिजोरीला भार आहे.

शाहुनगरातील घंटागाडीचा ठेकेदार बदलला

सातारा शहरातील शाहुनगर भागातील कचरा उचलणारा ठेकेदार घुले हा कचरा उचलत नव्हता. त्यामुळे नागरिकांच्या पालिकेकडे तक्रारी आल्या अन् आरोग्य विभागास नगराध्यक्षा माधवी कदम यांनी सूचना देताच त्या ठेकेदारास दुसरा वॉर्ड दिला असून त्या भागात साठलेला कचरा उचलण्यासाठी स्वच्छता अभियान करण्याची विशेष मोहिम आखली गेली आहे.

Related Stories

जिल्हा रुग्णालयाच्या आवारातील पार्किंग निश्चित

Patil_p

उंब्रज परिसरातील दोन टोळयांतील ७ जण तडीपार

Abhijeet Shinde

दीडशे दिवस हंगाम, इथेनॉल निर्मितीवर भर

Abhijeet Shinde

सातारा : पर्यटकांनो जरा दमानं

Abhijeet Shinde

जावलीत दोन अपघातात युवकाचा मृत्यू

Patil_p

निर्बंधाच्या निर्णयाने जनतेत खदखद

Patil_p
error: Content is protected !!