तरुण भारत

खेळाडू फंडार्थ लढतीत धेंपोची स्पोर्टिंग क्लबवर 4-2 अशी मात

क्रीडा प्रतिनिधी /मडगाव

पेनल्टीवर स्पोर्टिंग क्लुब दी गोवा संघाचा 4-2 गोलानी पराभव करून धेंपो स्पोर्ट्स क्लबने गोवा फुटबॉल संघटनेने खेळाडू मदतनिधी सामना जिंकला. धुळेरच्या मैदानावर खेळविण्यात आलेला हा सामना पूर्ण वेळेत गोलशून्य बरोबरीत संपल्याने तो टायब्रेकरवर निकाली ठरविण्यात आला.

Advertisements

धेंपो स्पोर्ट्स क्लबच्या विजयात त्यांचा नव्यानेच करारबद्ध करण्यात आलेला गोलरक्षक डायलन डिसिल्वाने मोलाचा वाटा उचलताना स्पोर्टिंग क्लुब दी गोवाचे दोन पेनल्टी फटके अडविले. धेंपो क्लबसाठी सूरज हडकोणकर, ऍरिस्टन कॉस्ता, एडवीन वियेगश व पेदू गोन्साल्वीसने तर पराभूत स्पोर्टिंग क्लुबसाठी मार्पुस मास्कारेन्हस व लिस्टन कार्दोझ यांनी गोल केले. म्हापसा नगरपालिकेचे नगरसेवक तारक आरोलकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले. यावेळी गोवा फुटबॉल संघटनेच्या उपाध्यक्ष अँथनी पांगो, जीएफएचे सदस्य बाबली मांद्रेकर, जॉन सिल्वा, अँथनी फर्नांडिस, कॉझ्मे ओलिव्हेरा, प्रँकी फर्नांडिस, ग्रेगरी फर्नांडिस आणि जॉन फर्नांडिस यांची उपस्थिती होती.

Related Stories

सरकारी कर्मचाऱयांना घरांसाठी कर्ज योजना बंद

Patil_p

वास्को चिखलीतील रस्त्यावर आगीच्या भडक्यात वाहने, लाखोंचे नुकसान

Patil_p

राज्यपाल मलिक यांची तडकाफडकी बदली

Omkar B

सत्तरीच्या विकासासाठी सदैव प्रयत्नरत राहणार

Amit Kulkarni

तब्बल 3101 नवे रुग्ण, 24 बळी

Amit Kulkarni

हातुर्ली येथे आज कुवयेवंस आळयेवंस देवाचा वर्धापनदिन

Amit Kulkarni
error: Content is protected !!