तरुण भारत

मौलाना सिद्दीकी यांना खोटय़ा आरोपाखाली अटक

प्रतिनिधी /बेळगाव

उत्तरप्रदेश येथे मौलाना कालिम सिद्दीकी यांना खोटय़ा आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर खोटे आरोप दाखल करून चौकशी सुरू आहे. कायद्याचा दुरुपयोग करून एका समाजाला लक्ष्य बनविले जात आहे. उत्तरप्रदेश येथे निवडणुका डोळय़ासमोर ठेवून चाललेल्या गुंडा कारभाराविरोधात आम्ही निषेध नोंदवित असल्याचे मुफ्ती तुफेल मोमीन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Advertisements

बेळगावमधील मुस्लीम समाजातील वकील व समाज बांधवांच्यावतीने शुक्रवारी हॉटेल संकम येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. मौलाना सिद्दीकी यांच्यावर धर्म परिवर्तन, मनी लॉन्ड्रिंग, दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करणे यासह इतर खोटे आरोप लावण्यात आले आहेत. प्रत्यक्षात हे आरोप सिद्ध होणार नाहीत. न्यायव्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास आहे. 4 तारखेला कोर्ट आपला निकाल देणार असून, त्यानंतर आम्ही आमच्या पुढील आंदोलनाची दिशा ठरवू, असे मौलाना बिलाद यांनी सांगितले.

ऍड. वकार शहापुरी यांनी सध्या देशात चाललेल्या गोंधळाबद्दल भाष्य केले. केवळ सूडबुद्धीने मौलानांवर आरोप करण्यात आल्याचे ऍड. अन्वर अली नदाफ यांनी सांगितले. यावेळी अश्पाक मडकी, लतिफखान पठाण, आयुब जकाती यांच्यासह इतर मुस्लीम समाजबांधव उपस्थित होते.

Related Stories

वकिलांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य देणार

Patil_p

राष्ट्रीय युवजन सप्ताहाची सांगता

Patil_p

सोमवारी 232 नवे रुग्ण तर 182 जण झाले बरे

Amit Kulkarni

मध्यवर्ती म.ए.समितीची आज बैठक

Patil_p

खानापूर तालुक्यातील बंधारे-पुलांवरील पाण्याची पातळी ओसरली

Amit Kulkarni

मांजा विकणाऱयांवर कारवाई सुरू

Patil_p
error: Content is protected !!