तरुण भारत

योगी आदित्यनाथांच्या भेटीनंतर कंगना रनौत झाली उत्तर प्रदेशच्या ODOP मोहिमेची ब्रँड अँम्बेसेडर!

ओनलाईन टीम/तरुण भारत

अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut Indian actress) ने शुक्रवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath Chief Minister of Uttar Pradesh) यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये सविस्तर चर्चा झाल्यानंतर उत्तर प्रदेश सरकारकडून कंगनाला ODOP ची ब्रँड अँम्बेसेडर (brand ambassador) म्हणून घोषित करण्यात आलं.

दरम्यान, लॉकडाउनच्या काळात सत्ताधारी शिवसेनेसोबत पंगा घेणारी अभिनेत्री कंगना रनौत आता उत्तर प्रदेश सरकारच्या एका महत्त्वाच्या मोहिमेची ब्रँड अॅम्बेसिडर झाली आहे. शुक्रवारी कंगनानं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. त्यांनतर उत्तर प्रदेश सरकारकडूनच ही घोषणा करण्यात आली आहे.

कंगना रनौतने प्रमुख भूमिका साकारलेला थलैवी (thalaivi) चित्रपट ओटीटीवर (OTT) प्रदर्शित झाला आहे. त्यानंतर कंगनानं पुढच्या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू केलं आहे. शुक्रवारी चित्रीकरण संपवून कंगनानं थेट लखनौ गाठलं आणि तिथे योगी आदित्यनाथ यांच्यासोबत तिची भेट झाली.

Advertisements

Related Stories

कोरोनाबाधितांच्या आकडय़ात मोठी वाढ

Patil_p

दिल्लीत 256 नवे कोरोनाबाधित

Rohan_P

नवीन कृषी कायदे मागे घेण्यासाठी शेतकरी आग्रही

datta jadhav

80 वर्षी वृद्धेचा कोरोनावर विजय

Patil_p

मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी पंतप्रधान मोदींना कोविड परिस्थितीची दिली माहिती

Abhijeet Shinde

लोकप्रतिनिधींना गाडण्याच्या उदयनराजेंच्या वक्तव्यावर अजित पवार म्हणाले…

Abhijeet Shinde
error: Content is protected !!