तरुण भारत

चक्क कुकरसोबत विवाह, मग घटस्फोट

इंडोनेशियात राहणाऱया एका व्यक्तीचा विवाह सध्या चर्चेत आहे. या व्यक्तीने एखाद्या मुलीशी नव्हे तर कुकरसोबत विवाह केला आहे. या व्यक्तीने स्वतःच्या अनोख्या विवाहाची छायाचित्रे फेसबुकवर शेअर केली आहेत. ही छायाचित्रे आता व्हायरल होत आहेत. पण या व्यक्तीने चार दिवसांनी कुकरसोबतचे नाते संपुष्टात आणत घटस्फोट घेतला आहे.

इंडोनेशियाच्या खोइरुल अनमने फेसबुक अकौंटवरून कुकरसोबतच्या विवाहाची छायाचित्रे शेअर केली. या छायाचित्रांमध्ये तो कुकरला कवटाळून, विवाहाच्या पोशाखात दिसून येत आहे.

Advertisements

काही छायाचित्रात तो कुकरसोब पोझ देताना दिसून येतो. मी स्वतःच्या राइस कुकरसोबत विवाह करण्याचा निर्णय घेतला. कुकर निष्पक्ष, आज्ञाधारक, प्रेम करणारा आणि स्वयंपाक करण्यात मदत करणारा असल्याने हे पाऊल उचलल्याचे त्याने पोस्टच्या कॅप्शनमध्ये नमूद केले आहे.

पण 4 दिवसांनीच अनमने कुकरपासून घटस्फोट घेतला. त्याने फेसबुकवर घटस्फोटाची घोषणा केली. हा कुकर केवळ भात शिजवू शकतो असे विचित्र कारणही त्याने दिले आहे. युजर्स या विवाहाला केवळ एक स्टंट ठरवत आहेत. स्थानिक वृत्त संकेतस्थळांनुसार अनम इंडोनेशियातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व असून तो स्वतःच्या फॉलोअर्सच्या मनोरंजनासाठी अजब स्टंट करत असतो.

Related Stories

तैवानमध्ये साई इंग-विन विजयी

Patil_p

फ्रान्स : 52 हजार रुग्ण

Patil_p

गांधी-किंग स्कॉलर्ली एक्सचेंज पुढाकार कायदा लागू

Patil_p

भारतीय गुप्तहेराला जर्मनीत तुरुंगवास

datta jadhav

‘कोविशिल्ड’ला दक्षिण आफ्रिकेतही मंजुरी

datta jadhav

चालू आठवडय़ातच रशियात कोरोनाविरोधी लसीकरण

Patil_p
error: Content is protected !!