तरुण भारत

सांगली : आहिंसेचे धडे देणारे शिक्षक गांधी जयंती कार्यक्रमात ऐकमेकांवर धावून

प्रतिनिधी / मिरज

मिरज तालुक्यातील खटाव येथे जिल्हा परिषद शाळेत गांधी जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात दोन शिक्षकांचे जोरदार भांडण होऊन हमरीतुमरी व परस्परांच्या अंगावर धावून गेल्याचा प्रकार घडला. गांधी जयंतीदिनी अहिंसेचे महत्व सांगणार्‍या शिक्षकांची हमरीतुमरी पाहण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी केली होती. मात्र याबाबत पोलिसात अधिकृत नोंद झाली नव्हती. प्रशासकीय चौकशीनंतर पुढील कारवाई होण्याची शक्यता आहे.

घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, महादेव देवाप्पा दळवी हे लिंगनूर येथे जिप शाळेत शिक्षक असून खटाव जि.प. शाळेत त्यांचा पुतण्या विद्यार्थी आहे. खटाव शाळेतील शिक्षक सुनिल लांडगे यांच्याविरुद्ध दळवी यांनी काही दिवसापूर्वी पंचायत समिती गटशिक्षणाधिकार्‍यांकडे तक्रार केली होती. दळवी शनिवारी गांधी जयंती कार्यक्रमास खटाव केंद्रशाळेत गेले होते. कार्यक्रमास वरीष्ठ मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमास दळवी यांना पाहिल्यानंतर सुनिल लांडगे यांचा पारा चढला. लांडगे यांनी दळवी यांच्या अंगावर धावून जात शिवीगाळ करुन खुर्ची फेकण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार आहे.

शिक्षकांचा हा तमाशा पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली. इतर शिक्षकांनी मध्यस्ती करीत वाद विकोपाला जाण्यापूर्वी दोघांना थांबविले. खटाव जिल्हा परिषद केंद्र शाळेत महात्मा गांधी जयंती दिवशी घडलेला या प्रकाराबाबत दळवी यांनी लांडगे यांच्याविरुद्ध ग्रामीण पोलिसांत तक्रार केली आहे. शाऴेत अरेरावी करणार्‍या भांडखोर शिक्षकांवर कारवाईची मागणी मागणी ग्रामस्थांनी गटशिक्षण अधिकाऱ्यांकडे केली आहे. शाळेत घडलेल्या या प्रकाराबाबत चौकशी करून संबंधित शिक्षकांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

Advertisements

Related Stories

कुपवाडमध्ये एकाच दिवशी तीन आत्महत्त्या, कुपवाडला दोन, बामणोलीत एक

Abhijeet Shinde

माळीण, तळईसारखी घटना घडल्यावर प्रशासनाचे डोळे उघडणार का ?

Abhijeet Shinde

दरोड्यातील आरोपीस कवठेमहांकाळ मध्ये अटक

Abhijeet Shinde

दोन मंत्री असतानाही सांगली जिल्ह्यातील नागरिकांची दयनीय अवस्था

Abhijeet Shinde

मातंग समाजातर्फे डॉ. विश्वजीत कदम यांचा सत्कार

Abhijeet Shinde

यापुढे ठोशास ठोशानेच उत्तर देणार

Abhijeet Shinde
error: Content is protected !!