तरुण भारत

एनपीएस विरुध्द ता.पं.समोर कर्मचाऱयांचे आंदोलन

दंडाला काळय़ा फिती बांधून केले आंदोलन

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisements

केंद्र सरकारने नवीन पेन्शन योजना लागू केली आहे. त्यामुळे सरकारी कार्यालयांमध्ये जी नवीन भरती करुन घेण्यात आली आहे. त्यांना ही स्कीम त्रासदायक आहेत. वृध्दापकाळात भेटणारी पेन्शन ही तुटपुंजी आहे. अशातच नवीन पेन्शन योजनेला वर्षपुरती असल्याने सरकारने प्रत्येक अधिकाऱयाला वर्षपुरती दिन साजरा आचरन करण्याचे सांगितले. मात्र ही योजना सरकारी कर्मचाऱयांना  घातक असून जुनी पेन्शन योजनाच लागू करावी या मागणीसाठी तालुका पंचायत कार्यालयासमोर सर्व अधिकाऱयांनी निदर्शने केली.

ट्रेजरी विभागातून प्रत्येक सरकारी कर्मचाऱयांना वेतन देण्यात येते. महत्वाचे म्हणजे या वेतनाची काही रक्कम नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर देण्यात येते तसेच पेन्शनही देण्यात येते. जुन्या पेन्शन योजनेंतर्गत महिन्याला 30 ते 40 हजार पेन्शन मिळत होती. आताही निवृत्त झालेल्या अधिकारी व कर्मचाऱयांना ती पेन्शन मिळते. मात्र नवीन पेन्शन योजनेंतर्गत महिन्याखेर केवळ 800 ते 1500 रुपये पेन्शन मिळण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यातून याला विरोध होत असताना सरकारने मात्र वर्षपुरती दिन साजरा करण्याची बळजबरी सुरू केली आहे.

या योजनेमुळे अनेक अधिकारी तसेच कर्मचाऱयांचे भविष्य अंधारात सापडणार आहे. सरकारच्या या योजनेला संपूर्ण राज्यातून विरोध करण्यात आला आहे. याचबरोबर तालुका पंचायतसमोरही एनपीएस योजनेला विरोध दर्शविण्यात आला. दंडाला काळय़ाफिती बांधून हे आंदोलन छेडण्यात आले. नवीन पेन्शन योजनेंतर्गत साऱयांनाच त्रास दायक ठरत असून जुनी पेन्शन योजनाच लागू करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी तालुका पंचायतचे कार्यकारी अधिकारी राजेश दनवाडकर, व्यवस्थापक सी. डी. चव्हाण, अकाऊंट अधिकारी शिल्पा वाली, पिडीओ श्रीधर सरदार, उषा एस., पुनम गडगे, कल्याणी चौगुले, ज्योती मेटी, श्रीनिवास हखाटी, वैजनाथ सनदी, विठ्ठल नाईक, लक्ष्मी कांबळे, सुचेता बेनकनळ्ळी, तालुका पंचायत कर्मचारी महेश्वरी, शैला दोडमनी, शिवलीला तारेकर यांच्यासह तालुका पंचायत इतर कर्मचारी उपस्थित होते.

Related Stories

आज ठरणार बार असोसिएशनचे अध्यक्ष पदाधिकारी

Amit Kulkarni

महाराष्ट्रातून आलेल्या तिघांना कोरोनाची बाधा

Rohan_P

‘अवघा रंग एक झाला’ आज कार्यक्रम

Amit Kulkarni

समाजसेवा पुरस्काराबद्दल बाबुराव मुरकुटेंचा सत्कार

Amit Kulkarni

बेळगाव दक्षिण विभागात ग़्17 ठिकाणी अबकारी छापे

Omkar B

एम. एस. शेषगिरीतर्फे वेबिनार

Amit Kulkarni
error: Content is protected !!