तरुण भारत

आध्यात्मकि साहित्याने कोंकणीचे दालन समृद्ध होणार – डॉ. भूषण भावे

पणजी

   साहित्य अकादेमीने दोन साहित्य प्रकारांवर जास्त भर दिला. एक अनुवाद आणि दुसरा आदिवासी साहित्य. अध्यात्मकि साहित्य लिहिण्याचा मुखवटा घालता येत नाही, त्यासाठी त्या कलाकृती विषयी आवड, प्रेम हृदयात असायला पाहीजे. संपदाने फार लहान वयात अध्यात्मकि साहित्यावर भर दिली आहे, म्हणून तिचं कौतुक करणे गरजेचे आहे. अश्या पुस्तकांने कोंकणीचें दालन समृद्ध होणार. असे प्रतिपादन केंद्रिय साहित्य अकादमीचे निमंत्रक डॉ. भूषण भावे यांनी केले.

Advertisements

            हीराभाई ठक्कर यांच्या ‘कर्मनो सिद्धा?त’ या मूळ गुजराती पुस्तकाचे, ‘कर्माचो सिद्धा?त’ या युवा लेखिका संपदा कुंकळकर यांनी केलेल्या कोंकणी अनुवादित पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. यावेळी व्यासपिठावर गोवा कोंकणी अकादमीचे अध्यक्ष श्री अरुण साखरदांडे, डॉ. भूषण भावे, डॉ. जयंती नायक, ज्योती कुंकळकर आणि संपदा कुंकळकर उपस्थित होत्या.

            श्री. अरुण साखरदांडे आपल्या भाषणात म्हणाले, दुसऱया भाषेतील पुस्तके जशी कोंकणी मध्ये अनुवादीत होतात तशींच कोंकणी साहित्य दुसऱया भाषांमध्ये येण्याची फार गरज आहे. जास्त करून हिंदी. कारण आपली राष्ट्रीय भाषा ही एक खिडकी आहे, एकदा साहित्यकृती हिंदीत अनुवादीत झाली तर इतर भांषाचं विश्व खुले होतात.

            डॉ. जयंती नायक  म्हणाल्या कोंकणी भाषेत आध्यात्मकि पुस्तके क्वचित आहेत. लेखिका संपदा कुंकळकर यांनी आध्यात्मकि पुस्तकाचे लेखन करुन कोंकणी भाषेसाठी योगदान दिले आहे. ती माणसाला कसे जगावे ते शिकवतात. यावेळी संपदा यांनी आपल्या मनोगतात सांगितले, पुस्तकाचा अनुवाद करणे म्हणजे शब्द अनुवाद करणे नव्हे. लेखकाने त्यात समरस होणे आवश्यक आहे.  हा सिद्धा?त निःस्वार्थ कर्म करा असे सांगतो.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उर्जिता भोबे यांनी केले तर स्वागत – प्रास्ताविक आणि आभार लेखिका ज्योती कुंकळकर यांनी केले. हे पुस्तक कुसुम प्रकाशन (गुजरात) यांनी प्रकाशित केले आहे.

Related Stories

फोंडा तालुक्यात कडक पोलीस बंदोबस्त

Amit Kulkarni

गणेश बाप्पाच्या आगमनासाठी सत्तरी तालुका सज्ज

Patil_p

स्मार्टफोन कनेक्टिव्हीटीसाठी उपोषण करणार

Amit Kulkarni

वेस्ट बंगाल ओरीसाच्या नागरिकांना खास रेल्वेतून गावी पाठवून द्या- मंत्री मायकल लोबो यांची मागणी

Omkar B

चार वाघाचा मृत्यू ते नखाचा शोधापर्यन्त तपास यंत्रणेचे काम युध्दपातळीवर

Patil_p

डॉ. सुरेश आमोणकरांच्या पार्थिवावर आमोणेत अंत्यसंस्कार

Patil_p
error: Content is protected !!