तरुण भारत

‘आप’तर्फे कौशल्य मार्गदर्शन

बाणावलीतील तरुणांना रोजगारसक्षम बनविणार –  कॅ. व्हिएगश

प्रतिनिधी/ पणजी

Advertisements

गोव्यातील तरुणांमध्ये कौशल्य विकसित करण्याचे ध्येय पुढे नेत आम आदमी पार्टीच्या युवा संघातर्फे गांधी जयंतीदिनी बाणावलीत शेकडो तरुणांना करिअर मार्गदर्शन करण्यात आले.

तरुणांना स्वावलंबी बनवताना त्यांच्यात कौशल्य विकास, मुलाखती कशा द्याव्या आणि विविध उद्योगात करिअर कसे करावे, आदी विषयांवर सुमारे 100 तरुणांना मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमास आपचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य तथा गोवा उपाध्यक्ष कॅप्टन वेन्झी व्हिएगश यांच्यासह युथ विंगच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष सेसिल रॉड्रिग्स यांचे मार्गदर्शन मिळाले.

गोव्यातील बेरोजगारीचे संकट सोडवण्यासाठी आम आदमी पार्टीने पुढाकार घेतला आहे. राज्यात बेरोजगारी प्रचंड वाढली असून विद्यमान सरकार रोजगारनिर्मिती करण्यात सपशेल अपयशी ठरले आहे. त्यामुळे तरुणांमध्ये नैराश्य पातळले आहे. त्यातून त्यांना भविष्य निवडणे कठीण जात आहे व अनेकांना त्याबद्दल पुरेसे मार्गदर्शन, कौशल्य प्रशिक्षण मिळत नाही. ही पोकळी भरून काढण्यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

युवा सरचिटणीस हॅन्झेल फर्नांडिस, ऍड. लॅन्सी रॉड्रिग्स, कॅ. वेन्झी व्हिएगश यांनी युवकांसह त्यांच्या कुटुंबियांशीही चर्चा करून मुलांना कोणत्या कौशल्यांची गरज आहे हे समजून सांगितले.

केजरीवाल यांच्या अनेक घोषणा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गेल्या महिन्यात गोवा भेटीत, आप सरकार स्थापन झाल्यानंतर प्रत्येक युवकाला रोजगार दिला जाईल, तसेच रोजगार उपलब्ध होत नाही, तोपर्यंत प्रत्येक कुटुंबातील एका युवकाला रु. 3,000 बेकारी भत्ता. पर्यटन किंवा खाण बंदीमुळे नोकरी गमावलेल्यांना दरमहा रु. 5,000 मिळतील. कौशल्य विद्यापीठ स्थापन करणे, गोव्यातील तरुणांसाठी खासगी क्षेत्रातील 80 टक्के नोकऱया राखीव ठेवण्यात येतील, यासारख्या अनेक घोषणा केल्या होत्या.

तरुणांना मार्गदर्शनाची गरज

महात्मा गांधी यांच्या विचारांना उजाळा देत सरचिटणीस हँझेल फर्नांडिस यांनी गांधी जयंतीदिनी आम्ही युवा टीम म्हणून हा उपक्रम आयोजित केला, असे सांगितले. अनेक तरुणांना मार्गदर्शनाची गरज आहे. केजरीवाल यांनी दिल्लीत या उपक्रमांना शाळा, महाविद्यालयातील अभ्यासक्रमात समाविष्ट केले आहे. हे मॉडेल बाणावलीमध्ये आणले पाहिजे असे आम्हाला वाटले, म्हणुनच या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले, असे ते म्हणाले.

तरुणांसाठी करिअर मार्गदर्शन अत्यंत महत्वाचे आहे. गोव्यात युवकांना आप  मॉडेलची गरज कशी आहे हे मतदार सांगतील. युवकांना सशक्त बनवण्यासाठी आम्हाला एकत्र काम करण्याची गरज आहे, असे सेसिल रॉड्रिग्ज यांनी सांगितले.

Related Stories

बेकायदेशीर घरांचीही होणार कर वसुली

Omkar B

पणजी मनपाचा अर्थसंकल्प आज

tarunbharat

वेरेंकर, देसाई, गरड यांना साहित्य अकादमी पुरस्कार

Omkar B

गोवा बनलाय महिलांसाठी असुरक्षित

Amit Kulkarni

आपण निवडणूक रिंगणात उतरणार हे नक्कीच- विनोद पालयेकर

Amit Kulkarni

खाणी सुरु होण्याच्या आशा पल्लवित

Amit Kulkarni
error: Content is protected !!