तरुण भारत

प्रत्येकाने इंदू आज्जींसारखे सामाजिक कार्यकरणे गरजेचे

प्रतिनिधी/ सातारा

 सध्याच्या काळात प्रत्येक क्षेत्रात महिला अग्रेसर आहेत. महिलांचे सबलीकरण, सक्षमीकरण होणे काळाची गरज आहे. प्रत्येकाने इंदूताई सारखे आपापल्या परीने समाज कार्य करत राहिले पाहिजे, ही काळाची गरज आहे, असे विचार फेम संस्थेच्या अध्यक्षा वर्षा लोखंड यांनी मांडले. येथील फेम इंटरऍक्शन सोशल सोसायटीच्या वतीने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल (कै.) माणिक शंकर लोखंडे सेवाभावी स्मृती पुरस्कार सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती इंदूताई कारळे (इंदूआज्जी) यांना देण्यात आला. याप्रसंगी त्या बोलत होत्या.

Advertisements

 पुढे त्या म्हणाल्या की, इंदू आज्जीची आर्थिक परिस्थिती खालावलेली असुन ही त्यांनी पैसे साठवुन इतर सेवाभावी संस्थांना मदत केली आहे. या वयात देखिल इंदू आज्जींची समाजातील गरजू नागरिकां प्रती असलेली निष्ठा पाहुन त्यांच्या कार्याला सलाम आहे. त्यांच्या या कार्याची दखल इतरांनी घ्यावी, असे ही यावेळी त्यांनी आपले विचार मांडताना सांगितले.

 संस्थेचा यंदा द्वितीय पुरस्कार सोहळा पार पडला असुन, यावेळी सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप होते. वयोमानानुसार इंदू आजींना हा पुरस्कार त्यांच्या निवासस्थानी जाऊन शनिवार दि. 2 रोजी ‘गांधी जयंती’ या दिवशी देण्यात आला. या कार्यक्रमा प्रसंगी शेखर लोखंडे, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र चोरगे, क्षीरसागर उपस्थित होते. त्यानंतर सत्कारोत्तर विचार मांडतांना इंदू आज्जांनी फेम सोसायटी तर्फे राबविण्यात येणाऱया सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले, तसेच त्यांच्या पुढील वाटचाली करीता शुभेच्छा ही व्यक्त केल्या. यावेळी महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्राr जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.

Related Stories

जिह्यातील सहा नगरपालिकांवर प्रशासक नियुक्त

Patil_p

सातारा : महाबळेश्वर – तापोळा मुख्य रस्त्यावर दरड कोसळली

Abhijeet Shinde

सातारा जिल्ह्यात सरासरी १८.३३ मि. मी. पाऊस

Abhijeet Shinde

जिल्ह्यात 1394 बाधित

datta jadhav

सातारा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घातला दहावा

Abhijeet Shinde

चंदगड तालुक्यात दुसरे पोलीस स्टेशन उभारण्यासंदर्भात शासन सकारात्मक

Abhijeet Shinde
error: Content is protected !!