तरुण भारत

कोवॅक्सिनच्या लहान मुलांवरील चाचणीचा डेटा DCGI कडे

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

भारत बायोटेकने कोवॅक्सिनच्या 2 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांवरील चाचणीचा डेटा ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे पाठवला आहे. त्यामुळे लवकरच कोवॅक्सिनच्या लहान मुलांवरील लसीला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

Advertisements

भारत बायोटेकचे अध्यक्ष डॉ. कृष्णा एला म्हणाले, सप्टेंबरमध्ये भारत बायोटेकने 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांवर लसीची चाचणी घेतली. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणी पूर्ण झाल्यामुळे तो डेटा शनिवारी डीसीजीआयकडे पाठविण्यात आला. जागतिक आरोग्य संघटनेकडेही हा डेटा पाठविण्यात आला आहे. यापूर्वी भारत बायोटेकच्या सर्व लसींना मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे लवकरच भारत बायोटेकच्या लशीच्या लहान मुलांवरील वापराला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे, असेही डॉ. एला म्हणाले.

Related Stories

हिमाचल प्रदेश : मुलींना सैन्यात जाण्याची संधी; चार सप्टेंबरपासून अंबालामध्ये भरती

Rohan_P

देशात लसीकरणाचा आकडा 50 कोटींवर

Patil_p

सुप्रीम कोर्टाचे केंद्र सरकारला नोटीस ; तुमचा कोव्हिडबाबत‘नॅशनल प्लॅन’ काय?

Abhijeet Shinde

‘स्पुटनिक-व्ही’ लसीची दुसरी खेप दाखल

Patil_p

पतंजलीकडून ‘कोरोनिल टॅबलेट’ सादर

Patil_p

निवडणूक आयोगाकडून दोन गोळीबारांची चौकशी

Patil_p
error: Content is protected !!