तरुण भारत

आघाडीच्या स्थानासाठी आज चेन्नई-दिल्ली लढत

वृत्तसंस्था/ दुबई

आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील दुसऱया टप्प्यात सोमवारी येथे माजी विजेता चेन्नई सुपर किंग्ज आणि दिली कॅपिटल्स यांच्यात आघाडीच्या स्थानासाठी चुरशीची लढत होणार आहे. या सामन्याला सोमवारी भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 7.30 वाजता प्रारंभ होईल.

Advertisements

संयुक्त अरब अमिरातमध्ये सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱया टप्प्यात चेन्नई आणि दिल्ली या दोन्ही संघांनी आपले वर्चस्व राखले आहे. प्ले ऑफ गटातील आपले स्थान या दोन्ही संघांनी यापूर्वीच जवळपास निश्चित केले आहे. स्पर्धेच्या गुणतक्त्यात हे दोन्ही संघ आघाडीचे स्थान मिळविण्यासाठी प्रयत्नशील असून प्राथमिक गटातील त्यांना आता केवळ एक सामना जिंकण्याची जरूरी आहे. गेल्यावर्षीच्या आयपीएल हंगामात तळाच्या स्थानावर असलेल्या चेन्नई संघाने यावर्षी चेन्नई& संघाने आपल्या कामगिरीत सातत्य राखत सर्वप्रथम प्ले ऑफ गटात स्थान मिळविले आहे. शनिवारच्या सामन्यात धोनीच्या चेन्नाई संघाने दर्जेदार कामगिरी करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना या सामन्यात राजस्थान रॉयल्सकडून पराभव पत्करावा लागला. राजस्थान संघाला चेन्नईकडून 190 धावांचे आव्हान दिले होते पण राजस्थानच्या जैस्वाल आणि शिवम दुबे यांनी आक्रमक फलंदाजी करत आपल्या संघाला 17.3 षटकांतच विजय मिळवून दिला. चेन्नई& संघाचा अमिरातमधील स्पर्धेतील हा पहिला पराभव होता. त्यांनी 12 सामन्यांतून तनी सामने गमविले आहेत. चेन्नई संघातील सलामीचा फलंदाज ऋतुराज गायकवाडने नाबाद शतक झळकविले पण त्याचे हे शतक चेन्नई&ला पराभवापासून वाचवू शकले नाही. चेन्नाई संघातील गायकवाड याची फलंदाजी बहरत असल्याने प्रतिस्पर्धी संघांना बाद फेरीच्या सामन्यात सावध राहावे लागेल. डु प्लेसिस, रायडू, मोईन अली, रविंद्र जडेजा आणि कर्णधार धोनी यांच्यावर फलंदाजीची तर शार्दुल ठाकुर, हॅजलवूड, जडेजा, ड्वेन ब्रॅव्हो आणि दीपक चहर यांच्यावर गोलंदाजीची भिस्त राहील. पंतच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सने यावेळी या स्पर्धेत समाधानकारक कामगिरी करत बाद फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे. स्पर्धेच्या गुणतक्त्यात दिल्ली संघाने 12 सामन्यांतून 9 विजय आणि तीन पराभवासह 18 गुणांसह दुसरे स्थान मिळविले आहे. कोलकाता संघाकडून पराभूत झाल्यानंतर दिल्लीने मुंबई इंडियन्सचा शेवटच्या सामन्यात पराभव करत पुन्हा मुसंडी मारली आहे. आता त्यांचे प्राथमिक गटातील दोन सामने बाकी आहेत. गेल्यावर्षी या स्पर्धेत दिल्लीला उपविजेतेपद मिळाले होते. धवन, पंत, अय्यर, स्टीव्ह स्मिथ, पृथ्वी शॉ हे या संघातील भरवशाचे फलंदाज आहेत.

Related Stories

अभिनेता पूरब कोहली सह पत्नी व मुलांना कोरोनाची लागण

prashant_c

प्रियंका गांधींना काँग्रेसचा चेहरा बनवण्यासाठी राहुल गांधींचा होता विरोध; प्रशांत किशोर यांचा खुलासा

Abhijeet Shinde

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय

Patil_p

नोव्हॅक जोकोविच, अलेक्झांडर व्हेरेव्ह, अँडी मरे तिसऱया फेरीत

Amit Kulkarni

सराव शिबिरातून बोल्टची माघार

Patil_p

जोआन लॅपोर्टो बार्सिलोनाचे नवे अध्यक्ष

Patil_p
error: Content is protected !!