तरुण भारत

‘सर्वोत्कृष्ट राज्य पुरस्कारा’ने कर्नाटक सन्मानित

कोरोनाकाळातील सुयोग्य व्यवस्थापनाचा ‘इंडिया टुडे ग्रुप’कडून गौरव

प्रतिनिधी /बेंगळूर

Advertisements

गेल्या दीड-पावणेदोन वर्षांच्या कोरोनाकाळात यशस्वीरित्या आरोग्य व्यवस्थापन केल्यामुळे कर्नाटकचा नवी दिल्ली येथे गौरव करण्यात आला. ‘इंडिया टुडे ग्रुप’कडून राज्य सरकारला ‘सर्वोत्कृष्ट राज्य पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी दिली. नवी दिल्ली येथे पुरस्कार स्विकारल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

मंत्री सुधाकर पुढे म्हणाले, सदर पुरस्कार राज्यातील कोरोना योद्धय़ांना समर्पित करतो. सर्वांच्या परिश्रमामुळे राज्याला पहिला पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्कारामुळे अत्यानंद झाला असून आणखीन काम करण्यास प्रोत्साहन मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पामुळे देशभरात कोरोना नियंत्रणात येत आहे. डिसेंबर महिनाअखेर कर्नाटकातील सर्वांना कोरोना प्रतिबंधक लस दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

मुलांचे लसीकरण करण्याबाबत चर्चा सुरू आहे. भारत बायोटेक आणि झायडस कॅडिला लसीबाबत चर्चा असून नाकाद्वारे डोस देण्याचा विचार आहे. नोव्हेंबरपर्यंत भारत बायोटेकच्या लसीला अनुमती मिळणार आहे. याचबरोबर झायडस लसीच्या किमतीबाबत निर्णय होणे बाकी आहे. सीरोच्या सर्वेक्षणानुसार राज्यातील नागरिकांमध्ये 60 टक्के रोग निरोधक शक्ती तयार झाली आहे. काही भागात हे प्रमाण 70 टक्क्याहून अधिक आहे. राज्यात 4 कोटी 98 लाख नागरिक कोरोना प्रतिबंधक लस घेण्यास पात्र आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

प्राथमिक शाळांसंबंधी दसऱयानंतर निर्णय

राज्यात प्राथमिक शाळा सुरू करण्याबाबत बोलताना मंत्री सुधाकर म्हणाले, एक ते 12 वर्षाखालील मुलांमध्ये सर्वाधिक रोगप्रतिकारक शक्ती असते. त्यामुळे पहिली ते पाचवीपर्यंत शाळा सुरू करणे गरजेचे आहे. पण पालकांच्या अनुमतीनुसार राज्यातील महाविद्यालये सुरू करण्यात आली आहेत. त्यानंतर टप्प्याटप्प्याने माध्यमिक शाळा सुरू केल्या. आता पहिली ते पाचवीपर्यंत शाळा सुरू करण्याबाबत दसऱयानंतर बैठक घेऊन निर्णय घेणार आहे, असे त्यांनी सांगितले.

Related Stories

राज्यात मंगळवारी पुन्हा कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ

Abhijeet Shinde

कर्नाटक : डिजिटल माध्यमातून पोटनिवडणुकीचा प्रचार करा : मंत्री सुधाकर

Abhijeet Shinde

बेंगळूर: बीबीएमपी झोनमध्ये मृत्यूचे प्रमाण एक टक्क्यांपेक्षा कमी

Abhijeet Shinde

कोरोना मदतकार्यासाठी मंत्री एक वर्षाचे वेतन देणार

Abhijeet Shinde

कर्नाटक : सरकारला पूरग्रस्तांची काळजी नाही: दिनेश गुंडूराव

Abhijeet Shinde

कर्नाटकात तौत्के चक्रीवादळ धडकलं: दक्षिण कन्नड जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु

Abhijeet Shinde
error: Content is protected !!