तरुण भारत

तुळजाभवानी नवरात्र महोत्सवाची जय्यत तयारी

प्रशासनाचा मनमानी कारभार ः अवघ्या 15 हजार भाविकांसाठी एवढी तयारी आणि खर्च का

प्रतिनिधी/तुळजापूर  

Advertisements

अवघ्या दोन-तीन दिवसावर राहिलेल्या श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र उत्सवासाठी प्रशासनाची जय्यत तयारी चालू आहे. मागील दोन वर्ष कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवरात्र उत्सव भरवण्यात आला नव्हता. पण कोरोना परिस्थिती काही प्रमाणात आटोक्मयात आल्याने यावषी प्रशासनाने नियम, अटी लागू करून नवरात्र उत्सव भरवण्यास परवानगी दिली आहे सुरुवातीला 60 आणि 30 हजार भाविकांना प्रवेशाच्या अफवांनी शहरात नागरिकांत आणि भाविकांत संभ्रमावस्था निर्माण झाली होती. मंदिर संस्थानच्या प्रसिद्धिपत्रकानंतर 15 हजार भाविकांना दर्शन देणार असल्याचे स्पष्ट झाले.

नवरात्र उत्सवासाठी प्रशासनाच्या वतीने मात्र जय्यत तयारी चालू झाली आहे येथील कार पार्किंगमध्ये भाविकांच्या सोयीसाठी दर्शन पाससाठी लागणारे बॅरिकेडिंग केल्याचे दिसत आहे तर भव्य दिव्य असा दर्शन मंडप उभा करण्यात आला आहे. भाविकांच्या सुविधेसाठी कार पार्किंग मध्ये स्टॉल तयार करण्यात आले आहेत. एकंदरीत जास्त संख्येने येणाऱया भाविकांसाठी लागणारी सर्व सुविधा प्रशासनाच्या वतीने उपलब्ध केल्याचे दिसत आहे.

 मात्र प्रशासनाने दरवषी नवरात्रोत्सवात लाखोच्या संख्येने येणाऱया भाविकांसाठी करण्यात येणारी तयारी आणि खर्च आता 15 हजार भाविकांसाठी करण्यात येत असल्याचे दिसत आहे. यावरून दररोज 15 हजार भाविकांना दर्शनासाठी सोडणार असतील तर एवढी तयारी आणि खर्च कशासाठी म्हणून शहरात उलटसुलट चर्चेला उधण आले आहे. तसेच प्रतिवर्षाप्रमाणे पुणे येथील विजय उंडाळे, नितीन उंडाळे, संजय तोडगे व सोमनाथ तोडगे हे देवी भक्त 2014 पासून श्री तुळजाभवानी मातेच्या दरबारात संपूर्ण मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई सेवा म्हणून मोफत करतात. याहीवषी आकर्षक विद्युत रोषणाई केली तसेच महाद्वारासमोर नगर परिषदेच्या वतीने आकर्षक पंती दीपमाला बसवण्यात आल्या आहेत. यामुळे मंदिराला आकर्षक सौंदर्य आले आहे.

नवरात्र कार्यक्रम पत्रिका

बुधवार  29 सप्टेंबर सायंकाळी देवीच्या मंचकी निदेस प्रारंभ

गुरुवार, दि 7 ऑक्टोबर पहाटे देवीची सिंहासनावर प्रति÷ापना, दुपारी 12 वाजता घटस्थापना, रात्री छबिना

शुक्रवार, 8 ऑक्टोबर  देवीची नित्योपचार पूजा व रात्री छबिना

शनिवार, 9 ऑक्टोबर देवीची रथ अलंकार पूजा व रात्री छबिना

रविवार, 10 ऑक्टोबर ललिता पंचमी, देवीची मुरली अलंकार पूजा व रात्री छबिना  

सोमवार, 11 ऑक्टोबर  शेषशाही अलंकार पूजा व रात्री छबिना

मंगळवार, 12 ऑक्टोबर भवानी तलवार अलंकार पूजा व रात्री छबिना

बुधवार, 13 ऑक्टोबर महिषासुर मर्दिनी अलंकार पूजा व रात्री छबिना

गुरुवार, 14 ऑक्टोबर महानवमी, दुपारी 12 वाजता होम कुंडावर धर्मिक विधी, घटोत्थापन, रात्री नगरहून येणाऱया पलंग पालखीची मिरवणूक

शुक्रवार, 15 ऑक्टोबर  विजया दशमी -दसरा, उषःकाली देवीचे सीमोल्लंघन, मंचकी निद्रा,

मंगळवार, 19 ऑक्टोबर कोजागरी पौर्णिमा

बुधवार,  20 ऑक्टोबर मंदिर पोर्णिमा, पहाटे देवीची सिंहासनावर प्रति÷ापना, रात्री सोलापूरच्या काठÎासह छबिना व जोगवा

गुरुवार, 21 ऑक्टोबर देवीची नित्योपचार पूजा, अन्नदान महाप्रसाद व रात्री सोलापूरच्या काठÎासह छबिना.

Related Stories

अशा ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा

Abhijeet Shinde

सोलापूर शहरात 45 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, एकाचा मृत्यू

Abhijeet Shinde

उस्मानाबाद : तरुणीच्या खुनाबद्दल तीघांना जन्मठेप

Abhijeet Shinde

सोलापूर विद्यापीठाच्या अंतिम वर्षाचा निकाल 31 ऑक्टोबरपर्यंत होणार जाहीर

Abhijeet Shinde

क्रीडापटूंसाठी नोकऱ्यात आरक्षणाबाबत जागृती व्हावी

prashant_c

उंदरगाव बलात्कार प्रकरणी मनोहर भोसले यास सात दिवसांची पोलिस कोठडी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!