तरुण भारत

शहर परिसराला जोरदार पावसाने झोडपले

शेतकऱयांना दिलासा, पाऊस पिकांना उपयुक्त : बॅरिकेड्स रस्त्यावर पडल्याने वाहतुकीला अडथळा

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

शहर परिसरात रविवारी झालेल्या जोरदार पावसाने सखल भागात पाणीच पाणी झाले. मागील दोन-चार दिवसांपासून शहरासह ग्रामीण भागात दुपारनंतर परतीच्या पावसाला प्रारंभ होत आहे. सकाळी कडक ऊन दिसत असले तरी दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण होऊन पावसाला प्रारंभ होत आहे. ‘ऑक्टोबर हिट’ला प्रारंभ झाल्याने शरीराची लाहीलाही होत आहे.

मागील चार दिवसांपासून सकाळच्या सत्रात उघडीप दिसत असली तरी दुपारनंतर पावसाला सुरूवात होत आहे. त्यामुळे छत्री व रेनकोट न घेता बाहेर पडलेल्या नागरिकांची तारांबळ उडत आहे. ढगाळ वातावरण निर्माण होऊन परतीच्या पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. त्यामुळे ढगाळ वातावरणासह हवेत देखील गारठा निर्माण होत आहे. काही दिवसांपासून सतत हजेरी लावणाऱया परतीच्या पावसामुळे शेतकऱयांना देखील दिलासा मिळाला आहे.

बाजारपेठेत रस्त्यावर पाणी

रविवारी दुपारी झालेल्या पावसामुळे बाजारपेठेतील काही रस्त्यांवर पाणी साचले.  तसेच बाजारात आलेल्या ग्राहकांसह क्यापारी वर्गांची तारांबळ उडाली. गटारींमधून पाण्याचा निचरा न झाल्यामुळे पाणी रस्त्यावरून वाहत होते. तर काही भागात  नागरिकांची वर्दळ कमी झाली होती. दरम्यान खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना दुकानांचा आडोसा घ्यावा लागला.

शहर परिसरात झालेल्या पावसामुळे विविध ठिकाणी जाणाऱया वाहनचालकांना अडचणी निर्माण झाल्या. दरम्यान पावसापासून बचाव करण्यासाठी  दुचाकी वाहनचालकांनी बसथांब्याचा आसरा घेतला. त्यामुळे बसथांब्यात देखील काही काळ गर्दी झाली होती.

ग्लोब टॉकीजजवळ बॅरिकेड्स पडले

रविवारी झालेल्या वादळी पावसामुळे काही ठिकाणी किरकोळ प्रमाणात पडझड झाली. ग्लोब टॉकीजसमोर रस्त्याच्या मधोमध उभा केलेले बॅरिकेड्स पडले. वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी उभारलेले बॅरिकेड्स रस्त्यात पडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला.

खरीप हंगामातील पिकांना उपयुक्त

मागील चार दिवसांपासून होत असलेला परतीचा पाऊस पिकांना उपयुक्त ठरला आहे. खरीप हंगामातील भात, भुईमूग, रताळी, यासह मका ज्वारी पिकांना पाऊस उपयुक्त ठरत आहे. तालुक्मयातील बहुतांशी भागात भात पीक पोसवणीच्या अवस्थेत आहे. या पिकांना हा पाऊस उपयुक्त ठरत आहे.

Related Stories

अतिवाड शिवारात वीजखांब-वाहिन्या धोकादायक

Omkar B

पाठीचा कणा ताठ ठेवा; क्षणभर ब्रेक घ्या!

Omkar B

कृषी उत्पादनाला वाजवी भाव देण्यासाठी प्रयत्नशील

Amit Kulkarni

कडोली भागातील रयत संघटनेचा उद्या मोर्चा

Patil_p

टेम्पररी वीजमीटरच्या वाढत्या तक्रारी

Patil_p

योग दिन आज ऑनलाईनद्वारे साजरा करणार

Patil_p
error: Content is protected !!