तरुण भारत

सावळीत फोटोग्राफरची लुटमार, १ लाख ३४ हजारांचे साहित्य चोरले

कुपवाड / प्रतिनिधी 

एका कुटुंबांच्या कार्यक्रमाचे फोटो काढण्यासाठी सावळी येथे आलेल्या प्रसन्ना सुकुमार किनिंगे रा.जैन गल्ली,मालगाव या फोटोग्राफरच्या कामगाराजवळील दोन कॅमेरे, एक लेन्स व मोबाईल मिळून १ लाख ३४ हजार रुपयांच्या साहित्य जबरीने चोरल्याची घटना उघडकीस आली.
रविवारी रात्री घडलेल्या या घटनेची नोंद कुपवाड पोलिसात झाली आहे. याप्रकरणी कुपवाड पोलिसांनी दोघां अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी प्रसन्ना किनिंगे यांचा मालगाव येथे फोटोग्राफरचा व्यवसाय आहे. किनिंगे यांचा कामगार अथर्व रविवारी रात्री सावळी येथील एका कुटुंबांच्या घरगुती कार्यक्रमाचे फोटो काढण्यासाठी आला होता.

फ़ोटो काढत असताना दोन अज्ञात तरुण त्याच्याजवळ गेले. यावेळी एका तरुणाने अथर्व जवळील १ लाख १५ हजार रुपयाचे दोन कॅमेरे,१५ हजार रुपयांचा लेन्स,४ हजारांचा मोबाईल असा १ लाख ३४ हजार रुपयांचा ऐवज हिसकावून घेऊन पलायन केले. याबाबत कुपवाड पोलिसात फिर्याद दाखल झाली. त्यानुसार पोलिसांनी दोन अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अविनाश पाटील करीत आहेत.

Advertisements

Related Stories

कडेगाव तालुक्यात धोक्याची घंटा; भिकवडीतील रुग्णसंख्या 4 वर

Abhijeet Shinde

“मोरया’ च्या जयघोषात घरोघरी गणराय विराजमान

Abhijeet Shinde

कोरोना मानसिक रोग, राज्य शासनाला कवडीची अक्कल नाही : संभाजी भिडे

Abhijeet Shinde

सांगली : माजी नगराध्यक्ष ॲड. सुधीर पिसे यांचे निधन

Abhijeet Shinde

सांगली : मिरजेत अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू

Abhijeet Shinde

सांगली : वडगावचे जवान दशरथ पाटील जम्मूत शहीद

Abhijeet Shinde
error: Content is protected !!