तरुण भारत

मये भु वि. नागरिक कृती समितीने आमदाराविरूध्द थोपटले दंड

प्रवीणझांटय़ मयेचा विषय सोडविण्या सफोल.त्यांनाच उमेदवारी दिल्यास समिती उमेदवारासरिंगणात उतरविणार.मयेचा विषयसोडण्यास मयेचाच उमेदवार द्यावा.समितीचा इशारा.

डिचोली/प्रतिनिधी

Advertisements

  मयेचा कस्टोडियन मालमत्तेचा विषय सोडविण्यास तसेच त्याचा प्रभावी पाठपुरावा करण्यास विद्यमान आमदार प्रवीण झांटय़? हे सपशेल फोल ठरले असून भाजपने पुन्हा त्यांनाच मयेत उमेदवार दिल्यास मये भु विमोचन नागरिक कृती समिती मये मतदारसंघात आपला उमेदवार रिंगणात उतरविणार, असा इशारा समितीने पत्रकार परिषदेत दिला आहे. मयेच्या याच विषयावर भाजपने मतदारसंघात आपले आमदार यापूर्वी निवडून आणले. आणि भाजप आज या मतदारसंघाला आपला बालेकिल्ला मानत आहे. मात्र प्रत्येकवेळी या विषयाकडे दुर्लक्ष झाले आहे. 2014 साली मयेचा प्रश्न सोडविण्यासाठी विशेष कायदा करूनही मयेच्या आमदारांना पाठपुरावा करता आला नाही. त्यामुळे हा विषय निकालात येऊ शकला नाही, असा थेट आरोप यावेळी समितीने पत्रकार परिषदेत केला. याविषयी आज (मंगळ. दि. 5) राज्यपालांना निवेदन सादर करणार, असेही सांगण्यात आले.

यावेळी समितीचे अध्यक्ष सखाराम पेडणेकर, सचिव राजेश कळंगुटकर, यशवंत कारभाटकर, एड. नारायण नार्वेकर, हरिश्चंद्र च्यारी, कालिदास कवळेकर, आनंद चोडणकर, आनंद वळवईकर, नकुळ इन्स?लकर आदींची उपस्थिती होती.

   या विषयावर समिती आमदारांना भेटली आणि त्यांनी नंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची समितीशी भेट घडवून आणली. त्यानंतर वरि÷ पातळीवर सर्व संबंधित अधिकाऱयांची बैठकही झाली. त्या बैठकीतील संपूर्ण चर्चा नोंदवहीत नोंदही झाली. या बैठकीनंतर आपण गेले 50 दिवस आमदारांकडे पाठपुरावा करीत आहे. मात्र आमदारांच्या पातळीवरून हवा तसा पाठपुरावा होत नसल्याने हा विषय भिजत पडला आहे. डिचोलीत सरकार तुमच्या दारी कार्यक्रमात याप्रश्नी विचारले असता आमदार निरुत्तर राहिले. या परिस्थितीत मयेवासीयांनी काय करावे. कोणाकडे दाद मागावी ? मये मतदारसंघात भाजपचा उमेदवार याच विषयावरनिवडून आला आहे. त्यानंतर याच विषयाचा वापर करून भाजपने मयेला आपला बालेकिल्ला केला. मात्र अजूनही हा विषय सोडू शकलेले नाही. अशी टिका सखाराम पेडणेकर यांनी केली.

भाजपने याच आमदाराला उमेदवारी देऊ नये.

   ज्या विषयाचे भांडवल करून मयेत भाजप विजयी होत आहे त्याच विषयाचा विसर पडणारा आणि हा विषय हाताळू शकणाऱया व्यक्तीला भाजप का उमेदवारी देते ? अशा व्यक्तीला भाजपने घरी बसवावे, अन्यथा म्हावळीं?गेवासीयांप्रमाणे प्रखर पाऊल उचलावे लागणार. मतदारसंघातील सर्व विषयांवर लक्ष देणे आणि ते सोडविणे आमदारांचे काम आहे. मात्र ते त्या पद्धतीने काम करीत नाही. या विषयाच्या विरोधात न्यायालयात गेलेल्या व्यक्तीशी आमदारांचे साटेलोटे आहे की काय ? अशी शंका आज आमच्या मनात येत आहे. असेही सखाराम पेडणेकर यां?नी म्हटले.

अपयशी ठरल्याबध्दल मये ग्रामसभेत चक्क अभिनंदनाचा ठराव !

सरकारने मयेचा प्रश्न सोडविण्यासाठी कायदा करूनही सदर कायद्याची अंमलबजावणी करण्यास सरकार फोल ठरले. तसेच या बाबतचा पाठपुरावा करण्यास आमदार अपयशी ठरले आहे. हा प्रश्न निकालात काढण्यास मयेचे आमदार प्रवीण झांटय़? हे अपयशी ठरल्याने त्यांचे अभिनंदन करणारा ठराव गेल्या 2 ऑक्टो. रोजी मये वायंगिणी पंचायतीच्या विशेष ग्रामसभेत घेऊन तो संमत करण्यात आला. सदर ठराव सखाराम पेडणेकर यांनी मांडला होता.

मयेचा विषय सोडविण्यात कोणाचा अडथळा ?

मयेच्या विषयासाठी 2014 साली विशेष कायदा करूनही सरकार हा विषय सोडू शकत नाही हि लज्जास्पद बाब आहे. समिती या विषयी वेळोवेळी आवाज उठवते त्यावेळी सरकार समितीला घेऊन बैठका घेते व आश्वासने देते. मयेतील सुमारे 1140 जणांचे अर्ज आले असून त्यातील निम्मेही अर्ज हातावेगळे झालेले नाही. यापुढे शेत जमिनींचा, काजूबागायतींचा विषय आहे, हे सर्व विषय कधी सोडविणार ? या विषयाबरोबरच मये गावचा मास्टर प्लेन व्हावा अशीही आम्ही मागणी केली होती.क्षमात्र त्याविषयीही कोणताच पाठपुरावा झालेला नाही हे आमच्या लक्षात आलेले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना हा विषय लवकर सुटावा असे वाटते, ते त्यादृष्टीने सरकारी अधिकाऱयांना आदेशही देतात. मात्र स्थानिक लोकप्रतिनिधी कमी पडत असल्याचे दिसून येत आहे. माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रिकर यांनीही हा विषय सोडविण्यासाठी मोठे परिश्रम घेतले. मात्र सदर विषय सुटू नये यासाठी कोण अडथळा आणत आहे. यावरही सरकारने विचार करावा. अशी मागणी सचिव राजेश कळंगुटकर यांनी केली.

सरकारने कायदा करूनही मयेचा प्रश्न सुटत नाही. हा प्रश्न सोडण्यास कोणाचा अगथळा आहे, की कोण हेतुपूर्वक हा विषय अडवत आहे ? यावर विचार होणे गरजेचे आहे. मयेतील जनता आज सरकारवर खुश नाही. लोकांना अन्न, वस्त्र, निवारा आहे, पण लोकांना मानसिक शांती नाही. मानवी हक्कांपासून मये खूपच दूर असून स्थानिक आमदारही या प्रश्नी कमी पडत आहे. अशी टिका एड. नारायण नार्वेकर यांनी केली.

मयेचा विषय हा मयेचेच स्थानिक नेतृत्व सोडवू शकते. ज्याला या विषयाची सरच नाही ते या विषयाकडे आत्मयितेने पाहूच शकत नाही. त्यासाठी यावेळी भाजप पक्षाने मयेत आमदार कोण पाहिजे याचा विचार करीत आमच्याशी चर्चा करावी. आम्ही नावे सुचवू शकतो, असा सल्ला यावेळी यशवंत कारभाटकर यांनी दिला.

Related Stories

‘बलराम’च्या शिक्षकांनी जाणल्या कर्लातील विद्यार्थ्यांच्या समस्या

Amit Kulkarni

साडेपाच लाखाची अवैद्य दारू जप्त

Patil_p

राज्य महामार्ग बनला मृत्यूचा सापळा

Patil_p

पर्यटकांचे लेंढे, चाचणी यंत्रणेचा बोजवारा

Omkar B

प्रो. लीग फुटबॉलमध्ये वास्कोचा वेळसाववर 3-2 गोलांनी विजय

Amit Kulkarni

फोंडय़ात ऐन थंडीत, पावसाच्या सरी

Amit Kulkarni
error: Content is protected !!