तरुण भारत

कुंडई उपसरपंचपदी सर्वेश जल्मी

वार्ताहर /मडकई

पुंडई पंचायतीच्या उपसरपंचपदी सर्वेश जल्मी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपसरंपच मोहन गावडे यानी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त होते.

Advertisements

 सोमवारी सकाळी झालेल्या निवडणुकीत सर्वेश जल्मी यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनरारोध झाल्याचे निर्वाचन अधिकारी प्रज्योती गावडे यांनी जाहीर केले.  रामू नाईक, मोहन गावडे, लक्ष्मण जोशी, शिल्पा कुवलेकर, संचिता परवार व विश्वास फडते हे पंचसदस्य यावेळी उपस्थित होते.

निर्वाचन अधिकारी म्हणून प्रज्योती गावडे यांनी काम पाहिले, तर त्यांना भिवा ठाकूर व सचिव पूजा गांवस यांनी साहाय्य केले.

 मगो नेते आमदार सुदिन ढवळीकर यांच्या मार्गदर्शाखाली पंचायतीचा क्षेत्राचा सर्वागिण विकास साधण्यासाठी आपले प्रयत्न असतील, अशी प्रतिक्रिया सर्वेश जल्मी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.

Related Stories

सतिश धोंड यांच्याकडून मायकल लोबोंना कानपिचक्या

Amit Kulkarni

अत्याधुनिक तंत्रज्ञानाने कला अकादमीची दुरुस्ती

Amit Kulkarni

वीज ‘ओटीएस’ योजनेस 31 जानेवारीपर्यंत वाढ

Patil_p

नानोडा शांतादुर्गा देवीचा आज कालोत्सव

Amit Kulkarni

वास्को शहरातील धोकादायक इमारतींमुळे लोकांच्या जीवाला धोका

Amit Kulkarni

राज्यपालांची सरकारला पुन्हा चपराक

Patil_p
error: Content is protected !!