तरुण भारत

दुर्गामाता दौडीला शासनाचा खोडा

प्रतिनिधी/सांगली

दुर्गामाता दौडीसाठी शिवप्रतिष्ठान आग्रही असले तरीही यंदाही दौडीला शासनाच्या आदेशामुळे खोडा बसण्याची शक्यता आहे. अद्याप प्रशासनाने परवानगी दिली नाही. शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरूजी यांनी सोमवारी प्रमुख धारकऱयांसह जिल्हा पोलीस प्रमुखांची भेट घेतली. त्याचबरोबर भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनीही शिष्टमंडळासह जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले. परंतु तोडगा निघाला नसल्याने मंगळवारी पुन्हा जिल्हाधिकाऱयांची भेट घेण्यात येणार आहे.

Advertisements

यावर्षी घटस्थापनेदिवशी मंदिरे उघडण्यात येणार आहेत. कोरोना महामारीचा विळखाही सैलावला आहे. त्यामुळे दौडीला परवानगी द्यावी, अशी मागणी करत भिडे गुरूजी आणि प्रमुख धारकरी अविनाश सावंत यांनी पाच दिवसांपूर्वी जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले होते. दुर्गामाता दौड म्हणजे भक्ती आणि शक्तीचा संगम आहे. दौडीची शक्तीच महामारीविरूध्द लढण्यास उपयोगी पडणार आहे. कोरोना काळात दौड बंद होती. यावर्षी कोरोनाचे सर्व नियम पाळून शिस्तबद्धपणे आणि शांततेत भव्य प्रमाणात दौड काढू. नियम भंग केला जाणार नाही. त्यामुळे दौडीला परवानगी मिळावी, अशी मागणी केली होती. दोनवेळा प्रयत्न करूनही जिल्हाधिकाऱयांची भेट न झाल्याने निवासी उपजिल्हाधिकाऱयांना निवेदन दिले होते.

 परंतु अद्याप परवानगी मिळाली नसल्याने सोमवारी संभाजीराव भिडे, अविनाश सावंत, मिलींद तानवडे आदींनी पोलीस प्रमुख दीक्षीत गेडाम यांची भेट घेतली.  शासनाने नवरात्र काळातील दांडिया, गरबा, दुर्गा दौड अशा गर्दी जमवणाऱया सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी घातली आहे. त्यामुळे परवानगी देणे शक्य नसल्याचे ते म्हटल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे मंगळवारी प्रमुख धारकऱयांसह जिल्हाधिकाऱयांची भेट घेण्यात येणार आहे.

  दसऱ्यानिमित्त धार्मिक कार्यक्रमांना परवानगी द्या ः देशमुख

 दरम्यान, दसरा सणानिमित्त दुर्गामाता दौड, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संचलन, गावोगावच्या परंपरागत मिरवणुका, उत्सव, पालखी सोहळÎांना नियम व अटंचे पालन करुन साजरे करण्याची परवानगी देण्याची मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी केली आहे.

यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस सुरेंद्र चौगुले, किसान मोर्चा अध्यक्ष परशुराम नागरगोजे, पलूस तालुका भाजप युवा मोर्चा अध्यक्ष सागर सूर्यवंशी, तुषार पाटील,  अभिजित गौराजे,  संजय पाटील,  श्रेयस कुंडले आदी  उपस्थित होते.

आज जिल्हाधिकाऱयांची भेट घेणार ः हणमंत पवार

 सर्व राजकीय पक्षांचे कार्यक्रम धुमधडाक्यात सुरू आहेत. केवळ शिवप्रतिष्ठानच्या दौडीलाच का परवानगी देण्यात येत नाही? शिवप्रतिष्ठानचे प्रशासनाला नेहमीच सहकार्य आहे, यापुढेही असेल. नियम पाळून दौड काढण्यासाठी धारकरी आग्रही आहेत. त्यामुळे आज मंगळवारी भिडे गुरूजींसह प्रमुख कार्यकर्ते जिल्हाधिकाऱयांची भेट घेणार असल्याची माहिती हणमंत पवार यांनी दिली.

Related Stories

सांगली : रेल्वेच्या जागेवरील अतिक्रमण धारकांना मुदतवाढ

Abhijeet Shinde

सांगली : पाऊसात खांद्यावर वाहिल्या त्याने चक्क 80 मेंढ्या

Abhijeet Shinde

केवायसीच्या नावाखाली शेतकऱ्याची ७४ हजारांची फसवणूक

Sumit Tambekar

आळसंद येथे प्राथमिक आरोग्य केंद्रास मंजुरी

Abhijeet Shinde

सांगलीत वृत्तपत्र विक्रेत्यांचे राज्यस्तरीय अधिवेशन; 15 राज्यातील विक्रेत्यांचा सहभाग

Abhijeet Shinde

सांगली : ‘कृष्णा’च्या तज्ज्ञ संचालकपदी दीपक पाटील व श्रीरंग देसाई यांची निवड

Abhijeet Shinde
error: Content is protected !!