तरुण भारत

Lakhimpur Kheri: प्रियंका गांधींच्या खोलीबाहेर ड्रोन? छत्तीसगढच्या मुख्यमंत्र्यांनी शेअर केला व्हिडिओ

उत्तर प्रदेश/प्रतिनिधी

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी (Lakhimpur Kheri) येथील हिंसाचारात चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा बळी गेल्यामुळे सोमवारी देशभरात तीव्र पडसाद उमटले. शेतकऱ्यांसह (Farmer) विरोधक आक्रमक झाले आहेत. दरम्यान लखीमपूर खेरी प्रकरण आणि त्या संबंधित बाधित कुटुंबांना भेटण्यासाठी चाललेल्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रियांका गांधी (priyanka gandhi) गेल्या २८ तासापासून पोलिसांच्या ताब्यात आहेत. आता प्रियंका गांधींना ताब्यात घेऊन ज्या खोलीत ठेवण्यात आलं आहे, त्या खोलीबाहेर ड्रोन (Drone) फिरताना दिसत आहे. असा व्हिडिओ छत्तीसगढचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी शेअर केला आहे.

छत्तीसगढचे मुख्यमंत्री भुपेश बघेल (Bhupesh Baghel Chief minister of Chhattisgarh) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओसोबत त्यांनी लिहिलं आहे की, ३० तासांहून अधिक काळापासून पोलिसांच्या ताब्यात असलेल्या प्रियंका गांधींच्या खोलीबाहेर हा कोणाचा ड्रोन आहे आणि तो का आहे? उत्तर कोण देईल?

दरम्यान प्रियंका गांधी यांनीही ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना सवाल केला आहे. “नरेंद्र मोदीजी (Narendra Modi Prime Minister of India) तुमच्या सरकारने कोणत्याही आदेश किंवा एफआयआरशिवाय मला गेल्या २८ तासांपासून ताब्यात ठेवलं आहे. अन्नदाताला चिरडणारी ही व्यक्ती अद्याप अटकेत नाही. का?,” अशी विचारणा प्रियंका गांधी यांनी केली आहे. यावेळी त्यांनी ट्वीटमध्ये त्या दिवशी झालेल्या घटनेचा व्हिडीओ शेअर केला आहे.

Advertisements

Related Stories

देशातील सर्वात लांब एक्स्प्रेसवेचे उद्घाटन

Patil_p

राजस्थानात 15 मंत्री शपथबद्ध

Patil_p

राष्ट्रवादीच्या सर्व आमदार-खासदारांचं महिन्याचं वेतन पूरग्रस्तांना – अजित पवारांची घोषणा

Abhijeet Shinde

दिल्लीतील कोरोना : मागील 24 तासात 255 नवे रुग्ण ; संसर्ग दर 0.35%

Rohan_P

टोलप्लाझा चकमकीतील ट्रकचालक पुलवामातील दहशतवाद्याचा भाऊ

Patil_p

डेंग्यू नियंत्रणासाठी केंद्राची पथके रवाना

datta jadhav
error: Content is protected !!