तरुण भारत

“शेतकऱ्याच्या विरोधात जाणार त्याचा पराभवच होणार”, बच्चू कडूंची अमरावती जिल्हा बँक विजयानंतर प्रतिक्रिया

अमरावती/प्रतिनिधी

अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा आज (५ ऑक्टोबर) निकाल लागला. यात परिवर्तन व सहकार पॅनल आमनेसामने होते. या निवडणुकीत राज्यमंत्री बच्चू कडू हे सुद्धा परिवर्तन पॅनलकडून निवडणूक रिंगणात होते. अमरावती जिल्हा बँकेची आज मतमोजणी पार पडली यात राज्यमंत्री बच्चू कडू यांनी बँकेचे माजी अध्यक्ष व काँग्रेस जिल्हाध्यक्ष बबलु उर्फ अनिरुद्ध देशमुख यांचा पराभव केला. बच्चू कडू यांनी दोन मतांनी विजय मिळवला आहे. विजयानंतर मंत्री बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘जे शेतकऱ्याच्या विरोधात जाणार त्याचा पराभव होणार’, असे त्यांनी म्हंटले आहे.

अमरावती जिल्हा बँक निवडणूक निकालाच्या विजयावर बोलताना बच्चू कडू म्हणाले, “शेतकऱ्यांनी चीड व्यक्त केलीय आणि त्याचाच हा विजय आहे. आम्ही हे दाखवून दिलं की जो शेतकऱ्याच्या विरोधात जाणार त्याचा पराभव झाल्याशिवाय राहणार नाही. ज्यांनी आम्हाला मदत केली त्यांचे मी आभार मानतो.” असे ते म्हणाले.

Advertisements

Related Stories

सातारा : जिल्ह्यात 24 तासात सरासरी 17.66 मि.मी.पावसाची नोंद

Abhijeet Shinde

यास चक्रीवादळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या ओडिशा आणि प. बंगाल दौऱ्यावर

Rohan_P

देशात बलात्काराचं सत्र सुरूच, महिला कॉन्स्टेबलवर तिघांनी बलात्कार करत रेकॉर्ड केला व्हिडिओ

Abhijeet Shinde

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांनी ओलांडला 20 लाखांचा टप्पा

Rohan_P

‘मोठी जबाबदारी, ती पार पाडायला आवडेल’ : दिलीप वळसे पाटील

Rohan_P

बारा बलुतेदारांचे मराठा आरक्षणाला बळ

Abhijeet Shinde
error: Content is protected !!