तरुण भारत

कोल्हापूर : नरबळीची कसून चौकशी करावी – अंनिस

प्रतिनिधी / कोल्हापूर

वारणा कापशी ता.शाहूवाडी येथून बेपत्ता झालेल्या आरव केसर या बालकाचा मृतदेह संशयास्पदरित्या त्याच्याच घराच्या मागे आढळून आला. हे प्रकरण नरबळीची असण्याची शक्यता आहे. याप्रकरणी पोलिसांनी कसून चौकशी करावी आशी मागणी प्रसिद्धी पत्रकाद्वारे अंधश्रद्धा निर्मूलन समितीनी केली आहे.

Advertisements

पत्रकात पुढै म्हटले आहे की, दोन दिवसापूर्वी आरव खेळण्यासाठी गेला होता. मात्र तो घरी परतलाच नाही. पालकांनी शोधाशोध केली परंतू तो कोठेही मिळून आला नाही.याप्रकरणी त्याच्या पालकांनी आरव बेपत्ता झाल्याची पोलिसात तक्रार केली होती.5 ऑक्टोबरला आरवचा मृतदेह त्याच्या घराच्या पाठीमागे टाकल्याचे निदर्शनास आले. मृतावर गुलाल टाकण्यात आला असून शरीरावर जखमा असल्याचे समजते. हा प्रकार नरबळी, किंवा खूनशी प्रवृत्तीतून झाला असावा अशी परिसरात चर्चा आहे. कोल्हापुरात आयुर्वेदिक दुकानातून मंत्र-तंत्र साठी लागणारे नख्या,लिंबू,बीबे, याचा खप मोठा आहे. म्हणजेच मांत्रिकांची संख्याही मोठी आहे. त्यांची नोंद पोलीस खात्याकडे करावी. अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अनिल चव्हाण,गीता हसूरकर,बी.एल.बरगे,अभिजीत पाटील, आदींनी पत्रकाद्वारे केली आहे.

Related Stories

‘आशां’ ना एक हजार प्रोत्साहन भत्ता

Abhijeet Shinde

शिरोळमध्ये तीन पानी जुगार अड्ड्यावर धाड; दोन लाखांचा मुद्देमाल जप्त चौघे ताब्यात

Abhijeet Shinde

शॉक लागून कर्मच्याऱ्याचा जागीच मृत्यू

Abhijeet Shinde

किरीट सोमय्या आज कोल्हापुरात येणार; घोरपडे कारखान्यावर मात्र नाही जाणार

Abhijeet Shinde

शिरढोण मध्ये कोरोनाचा एक बळी

Abhijeet Shinde

कोल्हापूर शहरातील 6 गुंड जिल्ह्यातून 2 वर्षासाठी हद्दपार

Abhijeet Shinde
error: Content is protected !!