तरुण भारत

सोने आयात सहा पटीहून अधिक वाढली

सणासुदीच्या काळात सोने मागणी मजबूत राहण्याचे संकेत – सप्टेंबरमध्ये 91 टक्के आयात

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisements

सणासुदीच्या कालावधीत देशामध्ये सोन्याची मागणी वधारल्याने सोने आयात रुळावर आल्याचे समोर आले आहे. यामध्ये सप्टेंबर महिन्यात 91 टन सोने आयात झाली आहे.  हा आकडा सप्टेंबर 2020 च्या तुलनेत 658 टक्के आणि कोविड महामारी सुरु होण्याअगोदर म्हणजे सप्टेंबर 2019 च्या तुलनेत 250 टक्क्यांपेक्षा अधिक राहिला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत सोन्याच्या किमतीत 20 टक्क्यांनी घसरण राहिली आहे. तर चालू सणासुदीच्या कालावधीत मजबूत मागणी राहणार असल्याचे संकेत अभ्यासक व्यक्त करत असून सोने आयात वाढवली आहे.

वर्ष 2020 मधील सप्टेंबरमध्ये फक्त 12 टन सोने आयात करण्यात आली होती. सप्टेंबर 2019 मधील सप्टेंबर महिन्यात फक्त 26 टन सोने आयात झाल्याची नेंद आहे. तेव्हा किमती 26 टक्क्यांनी वाढलेल्या होत्या. ज्यामध्ये मागणीही नकारात्मक राहिली होती. परंतु या सर्वात चालू महिन्यात सोने आयातीने उसळी प्राप्त केली असून जवळपास 91टन राहिली आहे.

 ऑक्टोबरमध्ये आयातीत आणखीन वृद्धी होण्याची शक्यता

सोने आयात वाढल्याचा प्रवास कायम सुरु असून ऑक्टोबर महिन्यातही हा प्रवास कायम राहणार असल्याचे संकेत आहेत. चालू महिन्यात दसरा आणि पुढील महिन्यात दिवाळी असल्याच्या कारणास्तव या दरम्यान सोने खरेदी मजबूत राहणार असल्याचे भाकीत केडियाचे संचालक अजय केडिया यांनी केले आहे. 

 सोन्याची किमत जवळपास 6 महिन्यांपासून नीचांकी पातळीवर आहे. सणासुदीमुळे सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये अधिक मागणीचे संकेत व्यक्त केले जात आहेत.

Related Stories

इलेक्ट्रीक वाहनांसाठी हय़ुंडाईची योजना तयार

Patil_p

एचडीएफसी म्युच्युअलने हिस्सेदारी जस्ट डायलमध्ये विकली

Patil_p

रिलायन्सशी कराराच्या संदर्भात अमेझॉन सर्वोच्च न्यायालयात

Patil_p

5 आयटी कंपन्यांकडून 96 हजार जणांची भरती

Patil_p

सात महिन्यानंतर निर्यातीत वाढ

Patil_p

कल्पतरु पॉवरने उभारले 200 कोटी रुपये

Patil_p
error: Content is protected !!