तरुण भारत

मनाबे, हॅसलमन, पॅरिसी यांना भौतिक शास्त्राचे नोबेल

स्टॉकहोम / वृत्तसंस्था

स्युकुरो मनाबे, क्लॉस हॅसलमन आणि जॉर्जिओ पॅरिसी या तीन संशोधकांना 2021 चे भौतिक शास्त्राचे (फिजिक्स) नोबेल पारितोषिक देण्यात येणार आहे. जटिल भौतिक व्यवस्था समजून घेण्यासाठी त्यांचे संशोधन पथदर्शक ठरणार असल्याने त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे अशी माहिती नोबेल पारितोषिक वितरण समितीने वृत्तसंस्थांना दिली.

Advertisements

वायूतील कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण वाढल्यामुळे तापमान वाढ कशी होते हे मनाबे यांनी सुस्पष्टरित्या दाखवून दिले. जॉर्जिओ पॅरिसी यांच्या संशोधनामुळे विस्कळीत पदार्थ व्यवस्थांची वैज्ञानिक रहस्ये उलगडणे शक्य झाले आहे. तर हवामान आणि पर्यावरण यांचा अतूट संबंध कसा असतो हे दाखविणारे प्रारुप निर्माण करण्यासाठी क्लॉस हॅसलमन यांना हे पारितोषिक देण्यात आले आहे.

या तीन्ही संशोधकांच्या कार्याचे महत्व आणि भौतिक शास्त्राच्या विविध प्रक्रिया सोप्या रितीने समजून देण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न हे आजवरच्या परंपरा मोडणारे आहेत. अनेक प्रचलित समजुतींना धक्का देणारी सत्ये त्यांनी शोधून काढली आहेत. नजीकच्या भविष्यकाळात तंत्रज्ञान आणि विज्ञानाची दिशा सुनिश्चित करण्यासाठी हे संशोधन उपयोगी ठरणार आहे, असे स्टॉकहोम येथील रॉयल स्वीडीश ऍकॅडमी या नोबेल वितरण संस्थेने स्पष्ट केले.

Related Stories

युरोप : संकट वाढतेच

Patil_p

हवेत मिसळलेल्या अतिसुक्ष्म थेंबांपासून संक्रमणाचा धोका कमी

Omkar B

एकेकाळी मोलकरीण आता टीव्हीवर सूत्रसंचालिका

Patil_p

पाकिस्तानच्या आरोग्यमंत्र्याना कोरोनाची बाधा

datta jadhav

सर्वात स्वतः इलेक्ट्रिक हवाईयान लवकरच

Patil_p

अमेरिकेत बाधितांची संख्या 1.25 कोटींवर

datta jadhav
error: Content is protected !!