तरुण भारत

अक्कलकोटच्या शिरपेचात मानाचा तुरा..

‘यंग सायंटिस्ट ऑफ इयर’ या मानाच्या पुरस्काराने भिमाशंकर गुरव सन्मानित

तरुण भारत संवाद प्रतिनिधी / अक्कलकोट

सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोटचे ‘भीमाशंकर गुरव’ हे ‘यंग सायंटिस्ट ऑफ इयर’ या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित झाल्यामुळे अक्कलकोटच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. अक्कलकोट येथील आणि सध्या डीआरडीओ पुणे येथे जॉइंट डायरेक्टर पदावर कार्यरत असलेले युवा वैज्ञानिक भीमाशंकर स्वामीराव गुरव यांना भारत सरकारच्या वतीने “यंग सायंटिस्ट ऑफ इयर” या मानाच्या पुरस्कारासाठी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

Advertisements

भीमाशंकर यांनी लहानपणापासूनच आपल्या बुद्धीची चमक दाखविली होती. शालेय जीवनात त्यांनी माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांचे जीवन चरित्र वाचले होते. त्यांच्या “अग्निपंख” या पुस्तकाने ते भारावून गेले. महाविद्यालयीन शिक्षण झाल्यानंतर केरळ येथे वैज्ञानिक क्षेत्रातील पदवी घेतली. त्यांचे बुद्धिकौशल्य पाहून डीआरडीओने त्यांना नोकरीची संधी दिली. या संधीचे सोने करीत भीमाशंकर गुरव यांनी वैज्ञानिक क्षेत्रातील नवनवीन तंत्र विकसित करून संरक्षण क्षेत्रात नावलौकिक मिळविला.

भीमाशंकर गुरव यांच्या वैज्ञानिक ज्ञानाची झेप पाहून त्यांना डीआरडीओचे जॉइंट डायरेक्टर पद देण्यात आले. त्यांनी संरक्षण क्षेत्रात अत्यंत भेदक डिझाईन तयार केले. याची नोंद संरक्षण दलाने घेतली आणि त्यांना यंग सायंटिस्ट ऑफ इयर म्हणून गौरविले. डॉक्टर डी. एस. कोठारी ऑडिटोरियम, डीआरडीओ भवन, नवी दिल्ली येथे डीआरडीओचे चेअरमन डॉक्टर रेड्डी आणि भारतीय सैन्य दलातील उच्चपदस्थ यांच्या उपस्थितीत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यापूर्वी अनेक वेळा भीमाशंकर गुरव यांना त्यांच्या संरक्षण दलातील नवनवीन तंत्रज्ञान विकसित केल्याबद्दल गौरविण्यात आले आहे

मात्र, संरक्षण मंत्री यांचे हातून झालेला सन्मान ही घटना म्हणजे अक्कलकोटच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. संरक्षण मंत्री यांनी युवा वैज्ञानिकांची मुक्तकंठाने स्तुती करून हे युवा वैज्ञानिक देशाचे आशास्थान असल्याचे नमूद केले. भीमाशंकर गुरव यांच्या सत्काराने अक्कलकोट वासियांची मान अभिमानाने उंचावली आहे.

Related Stories

नेताजी सुभाषचंद्र बोस यांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने अभिवादन

prashant_c

सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासावर भर देणार – जिल्हाधिकारी

Abhijeet Shinde

सोलापूर : वाळू तस्करांची शेतकऱ्यास मारहाण

Abhijeet Shinde

जीवे मारण्याची धमकी देत ऐवज लांबवणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या

Abhijeet Shinde

सोलापूर : नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत ३६ विषयांना मंजूरी

Abhijeet Shinde

सोलापूर ग्रामीणमध्ये 327 रुग्ण कोरोनामुक्त

Abhijeet Shinde
error: Content is protected !!