तरुण भारत

सांगली जिल्ह्यातील धार्मिक स्थळे सुरु करण्यास परवानगी

सांगली / प्रतिनिधी

सांगली जिल्ह्यातील धार्मिक स्थळे 7 ऑक्टोबर पासून शासनाच्या मानक कार्यप्रणाली व मार्गदर्शक सूचनांनूसार सुरु करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.

Advertisements

घटस्थापनेच्या मुहूर्तावर मंदिरे, प्रार्थनास्थळे सुरू होत असून याबाबत शासनाच्या, मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करणेच्या अटीस अधीन राहून परवानगी देणेत आली आहे. सदर प्रतिबंधीत क्षेत्राबाहेरील धार्मिक आणि प्रार्थना स्थळांच्या वेळेबाबत संबंधीत विश्वस्त, मंडळ, अधिकारी यांनी निर्णय घेणेचा आहे. मास्क परिधान करणे, शारिरिक आंतराचे पालन करणे, थर्मल स्क्रिनिंग करणे आणि वारंवार हात धुणे किंवा सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक राहील.
65 वर्षांवरील जेष्ठ नागरिक, इतर आजाराने ग्रस्त व्यक्ती, गरोदर महिला आणि 10 वर्षाखालील लहान मुले यांनी घरीच राहावे. धार्मिक, प्रार्थना स्थळांचे व्यवस्थापन करणाऱ्या संस्थांनी याबाबत नागरिकांना सूचना द्याव्यात. कोव्हीड -19 विषाणू संसर्गाचा सामान्य प्रतिबंधात्मक उपाययोजनां बरोबरच सध्या सार्वजनिक आरोग्य उपायांचेही पालन करणे आवश्यक आहे. या सर्व उपायांचे पालन सर्व धार्मिक स्थळे, प्रार्थनास्थळे या ठिकाणी सर्व कामगार, सेवेकरी, अभ्यागत, भाविक यांचे कडून पूर्ण वेळ पालन करणे बंधनकारक आहे, असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे

Related Stories

पुराणकथांनी पुरुषांना स्त्रियांवर अन्याय करायला शिकवले – डॉ.तारा भवाळकर

Abhijeet Shinde

म्हैसाळमध्ये बोगस खत कारखान्यावर छापा, 19 लाखांचा खतसाठा जप्त

Abhijeet Shinde

सांगलीत कोरोनाचा सोळावा बळी, नवे २८ रूग्ण

Abhijeet Shinde

सांगली : पेट्रोल गॅस दरवाढीच्या निषेधार्थ बैलगाडी मोर्चा

Abhijeet Shinde

प्रभाग १५ मध्ये २५ लाखांच्या रस्ते कामांचा शुभारंभ

Abhijeet Shinde

क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम प्रभावीपणे राबवा-जिल्हाधिकारी

Sumit Tambekar
error: Content is protected !!