तरुण भारत

विशाल टेक्स्टाईल पार्कला केंद्राची संमती

केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय, 11 लाख रेल्वे कर्मचाऱयांसाठी बोनस

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक विषयांवर महत्वाचे निर्णय घेण्यात आले असून त्यात ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत वस्त्रोद्योगाला प्राधान्य हा महत्वाचा निर्णय आहे. त्यानुसार या क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक आकर्षित करुन रोजगार निर्मिती केली जाणार आहे. विशाल वस्त्रोद्योग क्षेत्रांच्या (टेक्स्टाईल पार्क) निर्मितीला संमती देण्यात आली आहे. या क्षेत्रांना ‘पीएम-मित्र’ या नावाने ओळखण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे रेल्वेच्या 11 लाख कर्मचाऱयांसाठीही 7<8 दिवसांचे वेतन बोनस म्हणून देण्याचा निर्णय बैठकीनंतर घोषित करण्यात आला.

वस्त्रोद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठीची ही योजना 4,445 कोटी रुपयांची असून या निधीतून देशभरात विविध स्थानी सात विशाल वस्त्रोद्योग क्षेत्रे निर्माण करण्यात येणार आहेत. येत्या पाच वर्षांमध्ये त्यांची निर्मिती पूर्ण केली जाईल. ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुढाकाराने साकारली जाणार आहे.

या क्षेत्रांना केंद्र सरकार त्यांच्या एकंदर गुंतवणुकीच्या 30 टक्के (साधारणतः प्रत्येकी 500 कोटी रुपये किंवा त्याहून अधिक) भांडवली साहाय्य करणार आहे. खासगी क्षेत्रातून किंवा विदेशांमधूनही गुंतवणूक आकर्षित करण्यात येईल. खासगी क्षेत्रासाठी ही योजना अधिकाधिक आकर्षक करण्यासाठी प्रयत्न केले जातील. याशिवाय या वस्त्रोद्योग क्षेत्रात निर्माण होणाऱया उत्पादनांना 300 कोटी रुपयांपर्यंत करसवलत देण्यात येईल. त्यामुळे या उत्पादनांची स्पर्धात्मकता वाढणार आहे. नव्याने स्थापित प्रकल्पांना त्यांच्या उलाढालीच्या तीन टक्के करसवलत देण्यात येईल. नव्या प्रकल्पांना प्रारंभीच्या काळात अशी प्रोत्साहनपर सवलत आवश्यक असते, असेही मंत्रिमंडळ बैठकीत स्पष्ट करण्यात आले आहे.

अनेक इतर सवलती

पीएम-मित्र क्षेत्रांमध्ये इनक्युबेशन केंद्र, प्लग अँड प्ले सुविधा, विकसीत उत्पादन केंद्र परिसर, उत्तम मार्ग, वीज, पाणी, सांडपाणी प्रक्रिया व्यवस्था, कॉमन प्रोसेसिंग हाऊस, सीईपीटी आणि इतर संबंधित सुविधा देण्यात येतील. डिझाईन केंद्र, चाचणी केंद्र, कर्मचाऱयांसाठी वसतीगृहे आणि घरे, मनोरंजन केंद्रे, लॉजिस्टीक्स पार्क, गोदामे, कौशल्य विकास आणि प्रशिक्षण केंद्रे, वैद्यकीय सेवा केंद्रे अशा अनेक सुविधा व सोयी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

विशाल निर्यात ध्येय

2021-2022 या आर्थिक वर्षात वस्त्रप्रावरण क्षेत्राची निर्यात 44 अब्ज डॉलर्स इतकी होईल. आगामी पाच वर्षांमध्ये ती 100 अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्याची योजना आहे. आतापर्यंत या क्षेत्रातील उद्योजकांचा मोठा प्रतिसाद सरकारच्या विविध योजनांना मिळत आहे. तो पाहता 100 अब्ज डॉलर्सच्या निर्यातीचे ध्येय गाठणे सहज शक्य होईल, असा विश्वास केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला. त्यांनीच केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयांची माहिती पत्रकारांना दिली.

रेल्वे कर्मचाऱयांसाठी शुभवार्ता

सणासुदीच्या काळात रेल्वे कर्मचाऱयांसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने शुभवार्ता दिली आहे. कोरोना काळात बरेच दिवस रेल्वे बंद असतानाही रेल्वेच्या 11 लाख कर्मचाऱयांना 78 दिवसांचे वेतन बोनस म्हणून देण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्व पात्र बिगर गॅझेट कर्मचाऱयांना तो मिळणार आहे. यामुळे रेल्वेला 2,081.68 कोटी रुपयांचा खर्च येईल. 2019-2020 या आर्थिक वर्षातही तो देण्यात आला होता.

Related Stories

देशात पाच दिवसानंतर घटली रुग्णसंख्या

datta jadhav

अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला अर्थमंत्री

Patil_p

मुलींवर चांगले संस्कार नसल्यानेच बलात्कार; भाजप आमदाराने उधळली मुक्ताफळे

datta jadhav

निर्भया : दोषी मुकेशच्या याचिकेवर होणार तत्काळ सुनावणी

prashant_c

‘झोमॅटो, बर्गर किंग’च्या क्लबमध्ये आता एमी ऑर्गेनिक्सचा समावेश

Patil_p

कहाणी भारतातील एका अनोख्या गावाची

Patil_p
error: Content is protected !!